Today मंगळवार, 28th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Latur Municipal Election 2026: एकनाथ शिंदेंचा धडाका! लातूरमध्ये 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश, पाठिंबाही जाहीर

Latur Municipal Election 2026: एकनाथ शिंदेंचा धडाका! लातूरमध्ये 17 अपक्ष उमेदवारांचा शिवसेनेत प्रवेश, पाठिंबाही जाहीर

Latur Municipal Election 2026: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकाला आधीच धडाका लावला आहे. लातूर महापालिका निवडणुकीमध्ये उभे असलेल्या तब्बल 17 अपक्षांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आणि पक्षात प्रवेशही केला आहे. शिंदे यांनी पक्षाच्या वतीने सर्वांचे स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदेंच्या उमेदवारासाठी ही निवडणूक सोपी झाल्याची चर्चा आहे.

लातूर महानगरपालिकेतील 17 अपक्ष उमेदवारांनी भगवा झेंडा हाती घेत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्या सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात काहीजण भाजपमध्ये, तर काहीजण स्वतंत्र निवडणूक लढवणारे तर काहीजण इतर पक्षात कार्यरत होते. त्या सर्वांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद वाढल्याचं सांगण्यात येत आहे.

कोणत्या अपक्षांनी पाठिंबा दिला?

श्रीकांत रांजणकर, मनोज जोशी, निलेश मांदळे, अर्चना कांबळे, अजय गजाकोष, प्रशांत बिरादार, शोभा सोनकांबळे, प्रशांत काळे, ओमप्रकाश नंदगावे, राहुल साबळे, नरसिंह घोणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष उत्तमराव लोंढे आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

लातूर महानगर पालिका निवडणूक

एकूण प्रभाग 18 –

एकूण जागा 70

भाजपसर्व 70 जागा स्वतंत्र लढत आहे.

काँग्रेस – 70 (वंचित बहुजन आघाडी बरोबर आघाडी करून 70 पैकी 65 जागेवर काँग्रेस आणि पाच जागेवर वंचित बहुजन आघाडी).

राष्ट्रवादी अजित पवार गट – 60 जागावर निवडणूक. तर दहा जागेवर पुरस्कृत उमेदवार देणार

राष्ट्रवादी शरद पवार गट – 17 जागेवर अधिकृत उमेदवार, स्वतंत्र लढत आहे.

शिवसेना शिंदे – 11 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत, स्वतंत्र लढत आहे.

शिवसेना ठाकरे – 09 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत, स्वतंत्र लढत आहे.

MIM -09 जागेवर अधिकृत उमेदवार उभे केले आहेत, स्वतंत्र लढत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!