Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

परभणी : राज्यात भाजप महायुतीने घवघवीत यश मिळवलं असून केवळ लातूर, कोल्हापूरमध्ये भाजपला यश मिळवता आलं नाही. तसेच, मराठवाड्यातील परभणीत (Parbhani) महापालिकेतही भाजपला वर्चस्व मिळवता आले असून येथे ठाकरेंच्या शिवसेनेनं (Shivsena) सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. येथील जनेतेनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कौल दिल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक तसेच काँग्रेसचे नगरसेवक यांचा सत्कार परभणीत करण्यात आला. या सोहळ्याला बोलताना उबाठाचे पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार संजय जाधव (Sanjay jadhav) यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधले. भाजपने मताला 15 हजार रुपये वाटल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

परभणीत पालकमंत्र्यांनी पैसा, सत्तेची मस्ती अधिकाऱ्यांचा गैरवापर करुनही त्यांना त्यांच्या प्रभागातील नगरसेवक निवडून आणता आला नाही. त्यामुळे, त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही जाधव यांनी केली. मताला 15 हजार रुपये भाजपकडून वाटण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी फक्त आता सतरंज्या उचलायच्या. कारण, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे गुन्हेगार आहेत अशा लोकांना घ्यायचं आणि निवडणुका लढवायच्या असा धंदा भाजपने सुरू केल्याचे संजय जाधव यांनी म्हटले.

मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना भावनिक आवाहन केले आहे. भारतावर मोगलानी, इंग्रजांनी राज्य केलं. मात्र, त्यांचंही राज्य एक दिवस संपुष्टात आलं तशीच भाजपचीही एक्सपायरी डेट लवकर जवळ आलेली आहे. त्यामुळे खचून न जाता उद्धव ठाकरे यांनी दटून लढावे असेही जाधव यांनी म्हटले.

परभणीत शिंदेंच्या शिवसेनेला 25 जागा
परभणी महानगरपालिका निवडणुकीतील 65 जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने बाजी मारत सर्वात जास्त 25 जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या आल्या आहेत, त्यांच्यापाठोपाठ काँग्रेस 12, भाजप 12, अजित पवारांची राष्ट्रवादी 11, जनसुराज्य पक्ष 3 यशवंत सेना 1 आणि 1 अपक्ष अशा पद्धतीने निवडणुकीमध्ये संख्याबळ पाहायला मिळाला आहे. येथील निवडणुकीत भाजपने पैशांचा मोठा खेळा केला, सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. आता, निवडणूक निकालानंतरही खासदार बंडू जाधव यांनी भाजपने मताला 15 हजार रुपये वाटले, पण त्यांचे उमेदवार पडल्याचा गंभीर आरोप केला आहे.

19 वर्षानंतर पालिकेवर शिवसेनेचा भगवा
परभणीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहुल पाटील यांनी या निवडणुकीत पहिल्यांदा एकत्र येत ही निवडणुकीत चांगलीच रंगत आणली. 2011 साली परभणी नगर परिषद ही महानगर पालिका झाली, त्यावेळी तत्कालीन राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर काँग्रेसची सत्ता महापालिकेत आली, अगोदर नगर परिषद असताना ही केवळ 2007 ला झालेल्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत गजानन डहाळे हे शिवसेनेचे नगराध्यक्ष झाले होते. त्यांनंतर आता 19 वर्षानंतर परभणी महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!