Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Manoj Jarange Patil: ‘दोन नासके सांभाळले…’; अजित पवारांच्या पुण्यातील पराभवावर मनोज जरांगेंची प्रतिक्रीया

Manoj Jarange Patil: ‘दोन नासके सांभाळले…’; अजित पवारांच्या पुण्यातील पराभवावर मनोज जरांगेंची प्रतिक्रीया

Manoj Jarange Patil: महापालिका निवडणुकीचा निकाल लागला आहे. राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गटाला देखील चांगलं यश मिळालं. मात्र दुसरीकडे या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा फटका बसला आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांनी मोठं विधान केलं आहे.

मराठ्यांचं मतदान पडलं नाही…
‘यांनी बघायला काही ठेवलंच नाही, हे लई कलाकार आहेत. पहिली महाविकास आघाडी संपवली. आता शिंदेंचा आणि अजितदादांचा काटा काढला. अजितदादा पण असे लोक सांभाळतात त्यामुळे लोक लांब चालले आहेत. त्यांना आता कळालं पापी लोकं रक्ताने माखलेले लोक सोबत ठेवले तर असे परिणाम भोगावे लागतील. अजितदादांनी याच्यातून तरी समज घेतली पाहिजे. आपण असे नासके लोक सोबत ठेवले म्हणून आपल्यावर इतकी वाईट वेळ आली की मराठ्यांचं मतदान सुद्धा त्यांना पडलं नाही, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दोन नासके सांभाळले…
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठ्यांचं मतदान अजित पवार यांना झालंच नाही. नाहीतर पुण्यात अजितदादांना इतकं कमी यश मिळालं नसतं. अजित पवरांना भाजप का जवळ करत नाही? यातून अजित पवारांनी काहीतरी शिकावं.दोन नासके सांभाळल्यामुळे मराठा समाज दूर गेला. यामुळेच महापालिका निवडणुकीत पराभव झाला, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मिळालेल्या यशामुळे हवेत न जाण्याचा इशारा
मुसलमान दलित मराठा एक झाले की सगळ्यांचा धुरळा उडतो. म्हणूनच मी दलित मुस्लिम मराठ्यांना सांगत असतो की यांना एकदा पायाखाली चेंगरा, 2029 च्या निवडणुकीत होईल असं दिसत आहे. मराठवाड्यात हैदराबाद गॅझेटचा जीआर निघाला, अंमलबजावणी झाली, मात्र प्रमाणपत्र वाटप सुरू नाही, त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती दिवस वेड्यात काढतात ते बघू? त्यांना मराठ्याचे मत पडत आहेत. नुसता जीआर काढून मराठ्यांची फसवणूक केली तर मराठा समाज तुम्हाला पाडू शकतो. महापालिकेत मिळालेल्या यशामुळे हवेत जाऊ नका, असा इशाराही यावेळी जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना दिला आहे.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!