Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar vs BJP: निकालानंतर पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इंदापूरमध्ये मोठं खिंडार, बडा नेता भाजपच्या गळाला

Ajit Pawar vs BJP:  निकालानंतर पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इंदापूरमध्ये मोठं खिंडार, बडा नेता भाजपच्या गळाला

Ajit Pawar vs BJP: राज्यातील महानगर पालिकांचे निकाल जाहीर झाले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालेले नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर अजित पवारांनी खास लक्ष केंद्रात केले होते. मात्र या दोन्ही ठिकाणी भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीनंतर आता लगेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसला आहे. इंदापूरमध्ये पक्षाला खिंडार पडले आहे.

अजित पवारांना मोठा धक्का
इंदापूरमधील राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष विठ्ठलआप्पा ननवरे, माजी उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, विद्यमान नगरसेवक काकाशेठ शेटे- पाटील, गणेश राऊत, सुधाकर ढगे, संजय शिंदे, वसीमभाई बागवान, हाजी नवाब बागवान, अनिल पवार, माजी नगरसेवक अविनाश मखरे, माजी नगरसेवक व माजी जिल्हाध्यक्ष अनिल राऊत, माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे, लाखेवाडी गावचे माजी सरपंच प्रभाकर खाडे, निमगाव केतकी गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी वैभव जाधव, नरसिंपूर गावचे माजी सरपंच श्रीकांत दंडवते, ओबीसी सेलचे युवक अध्यक्ष महेश जठार, सामाजिक कार्यकर्ते उमेश क्षिरसागर, सामाजिक कार्यकर्ते समीर देशमुख, रासपचे इंदापूर शहराध्यक्ष हुसेन मुलाणी, सामाजिक कार्यकर्ते गोरख पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे, आमदार श्रीकांत भारतीय यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेली रवींद्र चव्हाण यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशाचा फायदा भाजपला आगामी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

मिरजमध्येही भाजपची ताकद वाढली
आज मिरज विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व ओम आदिनाथ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब होनमोरे, अस्मिताताई होनमोरे, सांगली जिल्हा परिषदेतील कृषी समितीचे माजी सभापती राजेंद्र माळी, बेडग गावचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू पाटील, सुरज खाडे, तुकाराम निकम, मोहन पाटील, दिनकर पाटील आणि अनिकेत पाटील यांचा समावेश आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!