Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘गौरीच्या घरच्यांना अनंतच्या जुन्या संबंधांविषयी…’; अनंत गर्जेच्या वकिलांचा कोर्टात धक्कादायक दावा

‘गौरीच्या घरच्यांना अनंतच्या जुन्या संबंधांविषयी…’; अनंत गर्जेच्या वकिलांचा कोर्टात धक्कादायक दावा

Gauri Palve Garje Death: भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे–गर्जे यांच्या आत्महत्येने राज्यभरात खळबळ माजली आहे. अवघ्या दहा महिन्यांपूर्वी थाटामाटात झालेले लग्न आणि त्यानंतर इतक्या अल्पावधीत गौरी यांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

गौरींचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत

शनिवारी संध्याकाळी वरळीतील घरात डॉ. गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळल्या. पोलिसांनी प्राथमिक चौकशीत पती अनंत गर्जेवर संशय असल्याचे म्हटले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर गर्जे स्वतः पोलिसांसमोर हजर झाले.

अनैतिक संबंधामुळे मानसिक छळ?

चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, अनंत गर्जे यांचे किरण इंगळे नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती गौरीला घर बदलताना मिळाली. या प्रकरणाबाबत त्यांनी पतीला विचारणा केली असता, “तुला जे करायचं ते कर, मला कुणाची भीती नाही. कुणाला सांगितलंस तर तुझं नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करेन,” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला आहे.

हेही वाचा – ‘तुमच्या मुली गरीबाला द्या, पण श्रीमंतांच्या…’; डॉ. गौरी गर्जेच्या वडिलांचे भावनिक आवाहन

अनंत गर्जे यांच्या वकिलांची स्पष्टीकरणे

अनंत गर्जेचे वकील मंगेश देशमुख यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. त्यांच्या मते, गर्जे 12.30 वाजता स्वतःहून पोलिसांसमोर सरेंडर झाले. माध्यमांमध्ये जे प्रसारित होत आहे ते पूर्णपणे सत्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. किरण इंगळेसोबतचे संबंध 2021 सालातील असून ही बाब दोन्ही कुटुंबांना आधीच माहित होती, तरीही सर्वांच्या संमतीने लग्न झाले, असा दावा त्यांनी केला. पोलिसांकडे गर्जे यांचा मोबाईल तसेच घरांच्या चाव्या सुपुर्द करण्यात आल्या असून तपास जलदगतीने सुरू आहे.

नणंदेवरील आरोपांवर वकिलांची प्रतिक्रिया

गौरींच्या नणंदेवर गौरीला त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर देशमुख म्हणाले, अनंत गर्जेची बहीण मुंबईतील राहत्या घरात कधीच आलेली नाही. ती आणि तिचा पती दोघेही सरकारी सेवेत आहेत आणि या प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंध नाही. गौरी आणि अनंत गर्जे यांचा शाही विवाह केवळ दहा महिन्यांपूर्वीच झाला होता. नव्या आयुष्याची स्वप्ने बाळगून त्या पतीच्या घरी आल्या होत्या. पण वर्षही न पूर्ण होताच गौरीने आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!