Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फुलं न् फुलाच्या पाकळी इतकी मदत करा…; अमोल मिटकरींचे मराठी कलाकारांना भावनिक आवाहन

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फुलं न् फुलाच्या पाकळी इतकी मदत करा…; अमोल मिटकरींचे मराठी कलाकारांना भावनिक आवाहन

पुणे: आठवडाभरापासून मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धाराशिव, बीड, लातूरसह अनेक गावांना पाण्याचा वेढा घालण्यात आला आहे, तर नद्यानाल्यांचे पाणी घरात घुसल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. पिकांची बिघडलेली स्थिती आणि घरांमध्ये पाण्याचा प्रवेश यामुळे शेतकरी व स्थानिक लोक मोठ्या संकटात आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुंबई-पुण्यात राहणाऱ्या मराठी कलावंतांना मदतीसाठी आवाहन केले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, ‘सोनू सूद जसा पंजाबमधील संकटग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे धावला, त्याचप्रमाणे आपण निदान फुलाच्या पाकळी इतकी मदत तरी मराठवाड्यातील आपल्या बांधवांना करावी. या मराठवाड्याने आपल्याला फाळके पुरस्कारापासून महाराष्ट्र भूषण पर्यंत पोहोचविले आहे.’

मिटकरी म्हणाले की, सध्या पूरग्रस्त भागात अन्नधान्य, औषधे, कपडे, निवारा यांसारख्या मूलभूत गरजांसाठी लोक त्रस्त आहेत. पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे पुण्या-मुंबईत राहणाऱ्या कलावंतांनी पुढे येऊन मदतीसाठी पुढाकार घ्यावा, असं भावनिक आवाहनही मिटकरींनी केलं आहे.

मराठवाड्यातील या महापूरामुळे नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तथापी, घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे. या परिस्थितीत स्थानिक प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रातील कलावंतांनी मदतीचा हात पुढे वाढवणे आवश्यक आहे. अमोल मिटकरींच्या आवाहनाने मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदतीची आशा निर्माण झाली असून, कलावंतांचा सहभाग संकटाविरुद्ध लढण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!