Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सोनम वांगचुक पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होते; लडाख डीजीपींचा मोठा खुलासा

सोनम वांगचुक पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होते; लडाख डीजीपींचा मोठा खुलासा

Sonam Wangchuk: लडाखचे डीजीपी एसडी सिंह जामवाल यांनी शनिवारी मोठा खुलासा केला. पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होते. त्यांनी स्पष्ट केले की पोलिसांनी अलीकडेच एका पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला अटक केली असून तो वांगचुक यांच्याशी संपर्कात होता आणि सीमेपलीकडून अहवाल पाठवत होता. डीजीपींनी पुढे सांगितले की वांगचुक पाकिस्तानमधील एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. तसेच बांगलादेशलाही गेले होते. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

वांगचुक यांना अटक –

दरम्यान, शुक्रवारी वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (NSA) अटक करून राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती तुरुंगात हलवण्यात आले. वांगचुक यांनी त्यांच्यावरचे आरोप कटाचा भाग असल्याचा दावा केला असून, केंद्र सरकार लोकांच्या मागण्या पूर्ण करण्याऐवजी माझा बळीचा बकरा म्हणून वापर करत आहे, असं म्हटलं होतं.

हेही वाचा – सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक; लेहमध्ये इंटरनेट सेवा बंद, हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू

हिंसाचार भडकवल्याचा आरोप

लेहमध्ये 24 सप्टेंबर रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान वांगचुक यांच्यावर हिंसाचार भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे. निदर्शकांनी भाजप कार्यालय आणि गाड्यांना आग लावली होती, ज्यात 4 जणांचा मृत्यू तर 80 हून अधिक जखमी झाले होते. केंद्र सरकारनेही वांगचुक यांना जबाबदार ठरवले असून, त्यांच्यावर भडकाऊ विधाने केल्याचा आणि राजकीयदृष्ट्या प्रेरित गटांशी संबंध ठेवून चर्चा बिघडवल्याचा आरोप केला आहे.

तथापी, डीजीपी जामवाल यांनी सांगितले की, हिंसाचाराच्या तपासात आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. नेपाळी नागरिकांसह काही परदेशी घटक या प्रकरणात सहभागी असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय वांगचुक यांच्या निधीविषयी एफसीआरए कायद्यांतर्गत चौकशी सुरू असल्याची माहितीही डीजीपींनी दिली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!