Today रविवार, 26th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Neelam Gorhe: ‘भोंदूबाबांचे उंबरठे झिजवण्याची मला गरज नाही’; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे तृप्ती देसाई यांना चोख प्रत्युत्तर

Neelam Gorhe: ‘भोंदूबाबांचे उंबरठे झिजवण्याची मला गरज नाही’; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे तृप्ती देसाई यांना चोख प्रत्युत्तर

Neelam Gorhe: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या ‘अशोक खरात’ प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले असून, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना पुण्यातून चोख प्रत्युत्तर दिले आहे. भोंदूगिरी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांनी वेढलेल्या अशोक खरात याच्याशी नाव जोडले गेल्याने संतापलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू स्पष्ट केली. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेले सर्व आरोप ‘कपोलकल्पित’ असल्याचे सांगत त्यांनी हे एक राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

नेमका वाद काय?
अशोक खरात याच्यावर आतापर्यंत १० गुन्हे दाखल असून, त्यात ८ गुन्हे लैंगिक अत्याचाराचे तर २ आर्थिक फसवणुकीचे आहेत. या प्रकरणाच्या एसआयटी (SIT) चौकशीदरम्यान खरातचे काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आले होते. याच पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी खळबळजनक दावा केला होता की, “डॉ. नीलम गोऱ्हे या मंत्रिपद आणि भविष्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून खरातच्या संपर्कात होत्या.”

नीलम गोऱ्हे यांचा खुलासा
पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितलं की, मी अशोक खरातला आयुष्यात कधीही भेटलेली नाही. मंत्रिपदासाठी किंवा आमदारकीसाठी भोंदूबाबांचे भविष्य पाहण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत.पुणे महानगरपालिकेत ज्यांना यश मिळाले नाही, असे काही ‘असंतुष्ट घटक’ माझ्याविरोधात हे नीच दर्जाचे कारस्थान रचत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा राजकीय द्वेषातूनच माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खरातच्या पोलीस कोठडीत वाढ
दुसरीकडे, अशोक खरात याची पोलीस कोठडी २९ मार्च रोजी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची कोठडी १ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. आज एसआयटीने खरातच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली असून, तपासाचा फास अधिक आवळला जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!