Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune Rain: पुणे आहे की शिमला? आयटी नगरी हिंजवडीमधला गारपिटीनंतरचा नजारा सोशल मीडियावर व्हायरल

Pune Rain: पुणे आहे की शिमला? आयटी नगरी हिंजवडीमधला गारपिटीनंतरचा नजारा सोशल मीडियावर व्हायरल

Pune Rain: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसासह अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील आयटी नगरी हिंजवडी परिसरामध्ये चक्क गारपिटीचा पाऊस झाला आहे. याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून पुणे आहे की शिमला असा संभ्रम निर्माण होत आहे. हवामान विभागाने यापूर्वीच पुण्याला अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवविला होता. हिंजवडीसह पुण्याच्या अन्य भागातही गारांचा पाऊस पडल्याची माहिती आहे.

गारपिटीने आंबा आणि द्राक्षाचं नुकसान
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर परिसरात अनेक भागात अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली असून या गारपिटीने आंबा व द्राक्ष पिकाचे नुकसान होणार आहे, या परिसरात सध्या कांदा पिकाची काढणी सुरू असून मोठ्या प्रमाणात गारा पडल्याने काढलेला कांदा सडण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by NDTV Marathi (@ndtvmarathi)

पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाच्या जोरदार सरी

सकाळपासूनच कडक ऊन पडल्याने उकाडा प्रचंड वाढला होता. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास आकाशात ढगांनी गर्दी केली आणि वातावरणात अचानक बदल झाला. पिंपरी-चिंचवडमधील काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण झाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली, तरी उकाड्यापासून सुटका झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पावसामुळे काही प्रमुख चौकांमध्ये वाहतूक संथ होऊन काही काळ विस्कळीत झाली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांतही शहरात अशाच प्रकारच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नंदुरबारमध्येही गारपिट…

नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ आणि परिसरातल्या गावांना अवकाळी पावसाने झोड़पल्याचे चित्र आहे. या भागात गारपीटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने जिल्ह्यातील काही भागात तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अशातच दुपारपासून जिल्हाभरात असह्य उकाडा आणि वातावरण पहायला मिळत होते. चार वाजेनंतर नंदुरबार तालुक्यातील पुर्व पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शनिमांडळ आणि परिसरतील गावात गारपिटीचा पाऊस पाहायला मिळाला आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!