Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Crime: नाशिकमध्ये ‘खरात’ पार्ट-2; व्यावसायिकाकडे आढळले महिलांचे 100+ अश्लील व्हिडिओ

Nashik Crime: नाशिकमध्ये ‘खरात’ पार्ट-2; व्यावसायिकाकडे आढळले महिलांचे 100+ अश्लील व्हिडिओ

Nashik Crime: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरण राज्यात गाजत आहे. असेच आणखी एक प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आलाय. सातपूर येथील व्यावसायिकाने अनेक महिलांबरोबर आक्षेपार्ह व्हिडिओ काढले आहे. या व्यावसायिकाच्या कार्यालयातील ऑफिस बॉय व इतर तिघांनी व्हिडिओ व फोटो असलेली हार्डडिस्क चोरून नेली होती. त्यासाठी ते व्यावसायिकाला ब्लॅकमेल करत होते. तब्बल बारा लाखांची खंडणी मागितल्यानंतर व्यावसायिकाने फिर्याद दिली. त्यानंतर चारही आरोपी पोलिसांनी गजाआड केले आहे. अश्लिल व्हिडिओ काढल्याप्रकरणी महिलांनी तक्रार केल्यास पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

सातपूर येथे 63 वर्षाच्या व्यक्तीचे अंगणवाडी सेविका, ब्यूटीपार्लर व इतर व्यवसायाचे कागदपत्रे काढून देण्याचे कार्यालय आहे. या व्यक्तीचे काही महिलांबरोबर असलेले आक्षेपार्ह व्हिडिओ काही जणांच्या हाती लागली होती. ती व्यक्ती संबंधित व्यावसायिकाला ब्लॅकमेल करू लागली होती. व्हिडिओ परत देण्यासाठी व्यावसायिकाला तब्बल बारा लाखांची खंडणी मागितली होती. परंतु व्यावसायिकाने खंडणी न देता सातपूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून चौघांना पकडले. त्यांच्याकडून एक हार्डडिस्क, दोन पेनड्राइव्ह आणि दोन मोबाइल हस्तगत केले आहे. पकडण्यात आलेल्या चार आरोपींची नावे पोलिसांनी जाहीर केली नाहीत. परंतु त्यातील एक आरोपी तक्रार देणाऱ्या व्यावसायिकाकडे तब्बल तेरा वर्षांपासून ऑफिस बॉय म्हणून नोकरीला होता.

हार्डडिस्क, पेनड्राइव्ह, मोबाइलमध्ये पोलिसांना महिलांचे तक्रार देणाऱ्या व्यावसायिकाबरोबर अश्लिल व्हिडिओ सापडले आहेत. वेगवेगळ्या महिलांचे तब्बल शंभरहून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ असल्याची माहिती पोलिस उपायुक्त किशोर काळे यांनी दिली.

2003 पासूनचे व्हिडिओ
हार्डडिस्कमध्ये तब्बल 2003 ते 2024 पर्यंत आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत. हे व्हिडिओ मोबाइल कॅमेऱ्या किंवा हॅण्डी कॅमने काढल्याचा संशय पोलिसांना आहे. व्यावसायिकानेच हे व्हिडिओ वेगवेगळ्या महिलांबरोबर काढल्याचे प्रथमदर्शी दिसत असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. या बाबत महिलांनी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल करून तपास केला जाणार आहे. महिलांच्या सुरक्षतेची गोपनीय पाळली जाणार आहे. महिलांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. विशेष पथक, क्राइम ब्रँच विशेष पथक या प्रकाराचा तपास करत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!