Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

किल्ले रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा; युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

किल्ले रायगडावरील वाघ्या श्वानाची समाधी हटवा; युवराज छत्रपती संभाजीराजे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अलिबाग: किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीशेजारी असलेली वाघ्या श्वानाची समाधी काढून टाकावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज माजी खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. ही समाधी सदृश्य संरचना येत्या 31 मेपूर्वी हटवावी, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र संभाजीराजे यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, वाघ्या नामक श्वानाचा शिवकालीन इतिहासात कुठलाही उल्लेख किंवा संदर्भ सापडत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कपोलकल्पित श्वानाचा पुतळा किंवा समाधी उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे.

संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 2012 मध्ये वाघ्या श्वानाचा पुतळा तिथून काढून फेकून दिला होता. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. पोलिसांनी तो पुतळा शोधून काढला आणि त्या ठिकाणी पुन्हा त्या चबुतऱ्यावर बसविला. याप्रकरणी 73 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या सर्वांची माणगाव सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. आता छत्रपती संभाजीराजे यांच्या मागणीमुळे वाघ्या श्वानाच्या समाधीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!