Today रविवार, 20th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Raigad: समुद्रकिनारी सहल बेलती जीवावर; अकोल्यातील क्लासेसमधील दोघांचा मृत्यू, लाटांचा अंदाज न आल्याने गेले वाहून

Raigad: समुद्रकिनारी सहल बेलती जीवावर; अकोल्यातील क्लासेसमधील दोघांचा मृत्यू, लाटांचा अंदाज न आल्याने गेले वाहून

रायगड: नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात अनेक शाळा-क्लासेस विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहलींच आयोजन करत आहेत. अशाच एका शासकीय सहलीत विद्यार्थी आणि शिक्षकाचा मृत्यू झाल्याच समोर आलं आहे. अकोल्यातली एका क्लासने कोकणातील रायगड जिल्ह्यात शाळेची सहल नेली होती. मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध अशा काशीद बीचवर शाळेची मुले समुद्राचा आनंद घेत असताना एक दुर्घटनेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गटातील व्यक्तींचा समुद्रात पडून मृत्यू झाला आहे.

अकोला येथील एका क्लासेसचे 12 विद्यार्थी आणि 3 शिक्षक असे फिरण्याकरिता रायगड जिल्ह्यातील काशिद बीच येथे गेले होते. त्यातील 2 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असे पाण्यात बुडाले असल्याचे समजतं आहे. त्यापैकी 1 विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहेत. तर एक विद्यार्थी सुखरूप आहे.

1) राम कुटे (वय 60 वर्षे) रा. अकोला, शिक्षक. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोर्ली PHC येथे पाठवण्यात आला आहे.

2) आयुष रामटेके (वय 19 वर्षे) रा. अकोला, विद्यार्थी. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरुड PHC येथे पाठवण्यात आला आहे.

3 ) आयुष बोबडे (वय 17 वर्षे) रा. अकोला हा विद्यार्थी सुखरूप आहे.

नेमकी घटना काय?

अकोल्यातील शॉरवीन क्लासेसचे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांसह कोकणातील काशीद बीचवर सहलीसाठी गेले होते. यावेळी समुद्रकिनारी फिरत असताना अचानक मोठी लाट आली. यात तीन जण वाहून गेले. यामधील दोघांचा मृत्यू झाला. तर एक विद्यार्थी गंभीर अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या सहलीसाठी या क्लासेसचे फक्त बारा विद्यार्थ्यांनी तीन शिक्षक रायगड जिल्ह्यात गेले होते. 5 नोव्हेंबर रोजी ते अकोल्याहून निघाले तर 7 नोव्हेंबरला अलिबाग येथे पोहोचले होते. शनिवारी दुपारी हा गट मुरुड तालुक्यातील काशीद बीचवर गेला होता. त्यावेळी काही जण समुद्रात पोहण्यासाठी उतरले होते. त्यात दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक पाण्यात गेले असताना हे दुर्घटना घडली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!