Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Leopard Attack : बिबट्यांपासून रक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा; राज्य सरकार, वनविभागाच्या अपयशानंतर ग्रामस्थांची स्वत:साठी लढाई

Leopard Attack : बिबट्यांपासून रक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचा पट्टा; राज्य सरकार, वनविभागाच्या अपयशानंतर ग्रामस्थांची स्वत:साठी लढाई

पुणे : उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून तिथे बिबट्यांच्या हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. बिबट्यांच्या दहशतीन ग्रामस्थ भयभीत झाल्याचं चित्र आहे. या बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ आपल्या परीणे वाटेल त्या उपाययोजना करत आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान मुलाचा मृत्यू झाला होता. त्या महिलांनी तर थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टाच घातल. बिबट्या प्रामुख्याने मानेवर हल्ला असतो. अशा प्रसंगी शेतात राबताना बिबट्याने आपली शिकार करु नये, म्हणून महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात घातल्याचं चित्र आहे.

शिरुर भागात राहणाऱ्या नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. तेचं त्यांच्या उपजीविकेचं साधन असल्यानं, शेतात जाण्याविना या शेतकऱ्यांसमोर पर्याय नसतो. पण त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यातून जीव कसा वाचवायचा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय. त्यावर पर्याय म्हणून जसं कुत्र्यांच्या गळ्यात खिळ्यांचे पट्टे घातले जातात, तसे पट्टे घालण्याचा निर्णय या बळीराजाने घेतला आहे.

प्रशासनाचं अपयश

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावत बिबट्याच्या हल्ल्यामध्ये लहान मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर राज्य सरकार आणि वनविभागाने दोन दिवस बिबट्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो काही यशस्वी ठरला नाही. आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं बळीराजावर टोकदार खिळ्यांचे पट्टे परिधान करण्याची वेळ आली आहे.

तिघांचा जीव घेणारा बिबट्या ठार

शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे नरभक्षक बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलं आहे. रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना वन विभागाला हा बिबट्या ड्रोनमध्ये दिसला. नंतर या बिबट्याला पकडण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न केला गेला, डार्ट मिस झाला. यामुळं सावध झालेल्या बिबट्याने थेट वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवरती प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. मग शेवटी दोन शार्प शूटरने या बिबट्यावरती तीन राऊंड फायर केले, यात बिबट्या ठार झाला. 6 वर्षे वयाचा नर जातीचा हा नरभक्षक बिबट्या आहे. 13 वर्षीय रोहनचा जीव ज्या ठिकाणी घेतला तिथून 400 मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आलं. हा तोच नरभक्षक बिबट्या असल्याचं त्याच्या नमुन्यांवर आणि ठस्यांवरून स्पष्ट झालं आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!