Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली; म्हणाले,…मारली आम्ही पवार कुटुंबाला निवडून दिलं

लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली; म्हणाले,…मारली आम्ही पवार कुटुंबाला निवडून दिलं

बारामती: राज्यातील आरक्षणाच्या संघर्षामुळे बारामतीत पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा तापत आहे. मराठा आणि ओबीसी समुदायांमध्ये संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील सक्रिय असताना, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबीयांवर टीका करत ओबीसी समुदाय एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. शरद पवारांच्या बारामतीत काही दिवसांपूर्वी हाकेंनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीही, त्यांनी ओबीसी बांधवांसह मोर्चा काढून पवार कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. आता पुन्हा बारामतीत लक्ष्मण हाके यांनी घणाघाती टीका करत ‘झक मारली आणि पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं,’ असा संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, 5 सप्टेंबरला आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी एल्गार मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती, तरी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज बारामती पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाके आणि इतर 14 जण उपस्थित झाले. यावेळी त्यांनी स्वतःला अटक करण्याची मागणी केली. तथापी, पोलिसांनी त्यांना नोटीस देऊन सोडले. यामुळे बारामतीत मोठे राजकारण सुरु झाले आहे.

हेही वाचा – लक्ष्मण हाकेंच्या सहकाऱ्यावर बीडमध्ये हल्ला; माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अजित पवारांवर आरोप

लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर आरोप करत म्हटले की, पवार कुटुंब आमच्या मागच्या 4 पिढ्यांना संपवले आणि पुढच्या 4 पिढ्यांसाठी महाज्योतीला निधी किंवा वसतिगृह बांधू दिले नाही. एखादा तरुण बोलला की त्याच्यावर अजित पवार गुन्हे दाखल करतात. आम्ही पवारांना झक मारायला निवडून दिलं. तथापी, त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली आणि म्हटलं की, ‘आर्थिक निकषावरच आरक्षण द्यायला हवे, पण सुप्रिया सुळे उत्कृष्ट नसून निकृष्ट संसदपटू आहेत.’

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!