Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Yavatmal District: महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याची होणार पुनर्रचना; महसूल विभागाकडून सरकारकडे प्रस्ताव सादर

Yavatmal District: महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याची होणार पुनर्रचना; महसूल विभागाकडून सरकारकडे प्रस्ताव सादर

Yavatmal District: महाराष्ट्र सरकारने नुकतेच ११ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये आणि तब्बल 69 अपर तहसील कार्यालये मंजूर केली आहेत. प्रशासकीय कामकाज सुलभ करणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना जिल्हास्तरावरील, तालुकास्तरावरील कामे जवळ उपलब्ध करून देणे, हा यामागील उद्देश होता.

यातीलच एक अपर जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे आणि जिल्ह्यातील पुसदमधील शेंबाळपिंपरी आणि उमरखेडमधील ढाणकी येथे अपर तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. यामुळे जिल्ह्याच्या महसूल विभागाची नव्याने पुनर्रचना होणार आहे. या पुनर्रचनेचा प्रस्ताव महसूल विभागाने शासनाकडे सादर केला आहे.

यवतमाळ मोठा जिल्हा :

यवतमाळ जिल्ह्यात आजघडीला तब्बल 16 तालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र बरेच मोठे आहे. जिल्हा मुख्यालयापासून अनेक गावांचे अंतर 100 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. लोकसंख्याही 27 लाखांच्या घरात आहे. हीच भौगोलिक क्षेत्रफळ आणि येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने पुसद येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले आहे.

नवीन रचना कशी असेल?

या अंतर्गत पुसद आणि उमरखेड हे दोन उपविभाग, पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव हे चार तालुके, हीच चार तहसील कार्यालये आणि शेंबाळपिंपरी व ढाणकी या नव्याने होणाऱ्या अपर तहसील कार्यालयांचा समावेश होणार आहे. एकूण 8 लाख लोकसंख्या पुसद अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडली जाणार आहे

दोन अपर तहसील कार्यालयांना मंजुरी :

पुसद आणि उमरखेड तहसील कार्यालयाचे विभाजन करून पुसदमधील शेंबाळपिंपरी आणि उमरखेडमधील ढाणकी या दुर्गम म्हणून गणल्या जाणाऱ्या मंडळासाठी अपर तहसील कार्यालय मंजूर झाली आहेत. त्यामुळे चार तहसील कार्यालय आणि दोन अपर तहसील कार्यालय यांचा समावेश पुसद अपर जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणार आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!