Today बुधवार, 4th नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nashik Accident News: इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन गंभीर

Nashik Accident News: इंदूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात, इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, दोन गंभीर

Nashik Accident News: वाहतूक कोंडीमुळं मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची घटना घडली आहे. इंधन वाहून नेणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली आहे. दुचाकीवरील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात नागरिकाने पाय गमावला आहे.

इंदूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. मनमाड – मालेगाव चौफुली येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन व्यक्तीना इंधन भरून जाणाऱ्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने अपघात घडला आहे. या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे.. त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात वाराणसी-गोरखपूर मार्गावर दोन जणांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे परिसरातील 44 भाविकांना अयोध्या व वाराणसी धाम व तेथून नेपाळकडे दर्शनासाठी घेऊन गेलेल्या खाजगी बसला वाराणसी जवळ भीषण अपघात झाला. उत्तर प्रदेशातील नादगंज जवळील नवसारा येथे रोडच्या रेलिंगला ही बस धडकल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील रोहिनखेड येथील सरस्वती पाखरे तर अकोला जिल्ह्यातील अन्नपूर्णाबाई अशा 2 महिला भाविकांचा जागीच मृत्यू झाला तर 35 जण या अपघातात जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती परिसरात धडकताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नागपूरमध्ये मद्यधुंद कारचालकामुळं पती पत्नीचा मृत्यू
नागपूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद कारचालकाच्या निष्काळजीपणामुळं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ज्येष्ठ नागरिक पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. बेलतरोडी पोलीस हद्दीत काल मध्यरात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. उपचारादरम्यान जखमी पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनिष नगर-बेसा मार्गावरील पूर्ती बाजार परिसरात काल मध्यरात्रीच्या दरम्यान हा अपघात घडला. मद्यप्राशन करून भरधाव वेगात कार चालवत असलेल्या पंकज डेकाटे या बँक अधिकाऱ्याने दुचाकीवरील विजय सावरकर आणि सुरेखा सावरकर या दाम्पत्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही दांप्मत्य कारखाली बऱ्याच अंतरापर्यंत फरफटत गेलं. दरम्यान, अपघातानंतर आरोपी चालक घटनास्थळावरून फरार झाला होता.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!