Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ashok kharat: अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार

Ashok kharat: अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार

Ashok kharat: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातला एसआयटीने (SIT) आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले होते, यावेळी न्यायालयाने अशोक खरातला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे, खरातचा पोलिसांच्या (Police) तावडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल असून एसआयटीने न्यायालयातून आज लगेचच तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला.

सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला हा तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर असून, एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगाच होईल, असे आमिष दाखवत त्याने महिलेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एकीकडे खरातची कसून चौकशी सुरू असताना दुसरीकडे खरातशी संबंधितांनाही पोलिसांकडून नोटीस बजावली जात आहे.

अशोक खरातशी जवळीक असल्याच्या कारणावरुन रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, रुपाली चाकणकर यांना एसआयटी पथकाने नोटीसही बजावल्याची माहिती होती, मात्र अद्याप त्यांची कुठलीही चौकशी झाली नाही. आता, रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिस नोटीस बजावणार असल्याची माहिती आहे. समता पतसंस्थेतील खात्यांसदर्भात पोलिस त्यांची चौकशी करणार आहे. समता पतंसंस्थेत प्रतिभा चाकणकर यांचे देखील चार खाते आहेत. प्रतिभा चाकणकर यांच्या नावे दोन तर त्यांच्या मुलांच्या नावे दोन खाती आहेत. विशेष म्हणजे, या चार खात्यांवर 2 कोटी 40 लाख रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याने आता या पैशांसदर्भात आणि आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी होणार आहे.

समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेले 100 खाते तर सिन्नर येथील जगदंब पतसंस्थेत खरात नॉमिनी असेलेले 32 खाते आहेत. सिन्नर येथील जगदंब 32 खात्यांची चौकशी नाशिक ग्रामिण पोलीस करणार असून समता पतसंस्थेतील खात्यांची चौशी शिर्डी पोलिसांकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रतिभा चाकणकर यांची चौकशी होणार असल्याची विश्वसनीय सुत्रांची माहिती आहे.

नकली वाघ, साप याचा तपास करायचाय?
दरम्यान, आज न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपी अशोक खरात लोकांना नकली साप आणि वाघ दाखवून घाबरवत असे. तसेच मंतरलेले खडे, चिंचोके विकून फसवणूक करत होता. महिलांना काही द्रव्य किंवा पेढे खाऊ घालून अत्याचार केल्याचा संशय असून, त्या पदार्थांमध्ये काय मिसळले जात होते, याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच नकली साप, वाघ आणि इतर साहित्य तो कुठून आणत होता, याचाही तपास बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!