Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Heat Waves: अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन

Heat Waves: अतिउष्णतेच्या संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे उद्घाटन

Heat Waves: हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या अतिउष्णतेच्या लाटेचा फटका शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राला बसत आहे. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार सक्षम उपाययोजना करत असून, आयआयएम, नागपूर येथे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर हिट रेसिलियन्स अँड सस्टेनेबल कुलिंग’ या केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे या केंद्राचे उद्घाटन केले. हे केंद्र भविष्यात राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा (SIDM) महत्त्वाचा भाग म्हणून कार्यरत होईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेतकरी आणि शहरी नियोजनावर विशेष भर
वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका अल्पभूधारक शेतकऱ्यांना बसत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. “दुष्काळ, गारपीट आणि उष्णतेच्या लाटेमुळे शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याची वेळ येते. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल,” असे ते म्हणाले. या केंद्राच्या माध्यमातून सुरुवातीला ‘उष्णलाट कृती आराखडा’ (Heat Action Plan) आणि ‘शहरी हवामान कृती आराखड्या’चा आढावा घेतला जाईल. तसेच अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतील.

ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र होणार स्वयंपूर्ण
शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले की, 2030 पर्यंत 52% आणि 2035 पर्यंत 65% ऊर्जा अपारंपरिक स्रोतांतून मिळवण्याचे नियोजन आहे. विशेषतः शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज सौर ऊर्जेद्वारे देण्याचा प्रयत्न सुरू आहे. वाढत्या उष्णतेमुळे एसीचा वापर वाढून पर्यावरणाचे नुकसान होऊ नये, यासाठी बांधकाम क्षेत्रात पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे.

नागपूरला प्राप्त झाले आंतरराष्ट्रीय महत्त्व
‘नॅचरल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल’ (NRDC) चे अध्यक्ष मनीष बापना यांनी या केंद्राच्या स्थापनेचे स्वागत केले. ते म्हणाले की, “स्वच्छ ऊर्जा आणि शाश्वत कूलिंग हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. नागपुरातील हे केंद्र केवळ भारतासाठीच नाही, तर जगासाठी एक आदर्श ठरेल.” आयआयएम नागपूर आणि अमेरिकेतील NRDC या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे या केंद्राला जागतिक दर्जाचे तांत्रिक सहकार्य मिळणार आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेचा विस्तार
केंद्र शासनाच्या धर्तीवर मिहान, नागपूर येथे 184 कोटी रुपये खर्चून ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्था’ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये एकूण आठ उत्कृष्टता केंद्रे (Center of Excellence) असतील, ज्यातील एक केंद्र अतिउष्णता आणि शाश्वत शीतकरणासाठी समर्पित असेल. नागपूरचे तापमान दरवर्षी 45°C च्या पुढे जात असल्याने, हे केंद्र शहरातील आरोग्य, पाणी उपलब्धता आणि वीज वापर यांवर होणारे परिणाम कमी करण्यासाठी प्रभावी उपाय सुचवेल. या कार्यक्रमाला आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी आणि आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भिमराया मैत्री यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!