Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gangapur Accident : भरधाव स्कॉर्पिओने हिरावले तीन जीव, दांपत्यासह एक वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत

Gangapur Accident : भरधाव स्कॉर्पिओने हिरावले तीन जीव, दांपत्यासह एक वर्षाच्या चिमुकल्याचा करुण अंत

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : गंगापूर तालुक्यातील वरखेड शिवारातील नांदूर मध्यमेश्वर कालवा रस्त्यावर सोमवारी, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबाचा अंत झाला. भरधाव स्कॉर्पिओने मोटरसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत तरुण दांपत्य सजन राजू राजपूत (वय २८), शितल सजन राजपूत (वय २५) आणि त्यांचा एक वर्षाचा मुलगा कृष्णांश यांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने गंगापूर आणि वैजापूर परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओ गाडीने भरधाव वेगाने येत असताना तिने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की, मोटरसायकलवरील सजन, शितल आणि त्यांचा चिमुकला कृष्णांश हवेत फेकले गेले आणि शेतात जाऊन पडले. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. सजन आणि त्यांचे कुटुंब वैजापूर तालुक्यातील सटाणा गावचे रहिवासी असून, ते वाळूज औद्योगिक वसाहतीत राहत होते. सुट्टीसाठी ते आपल्या मूळ गावी सटाण्याला गेले होते आणि वाळूजला परतत असताना हा अपघात घडला.

अपघाताची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका सेवेने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉ. विशाल सुर्यवंशी आणि डॉ. मुजम्मिल शेख यांनी तपासणी केल्यानंतर तिघांनाही मृत घोषित केले. अपघाताची बातमी समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली, आणि तिथे हंबरडा फोडत हृदयद्रावक वातावरण निर्माण झाले.

या अपघाताची नोंद शिल्लेगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस कॉन्स्टेबल विनोद बिघोत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे. स्कॉर्पिओ चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकाची ओळख पटवणे आणि अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेणे सुरू आहे. प्राथमिक तपासात स्कॉर्पिओच्या अतिवेगामुळे हा अपघात घडल्याचे दिसून येत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!