Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुणे हादरले..! संपत्तीच्या वादातून मुलाचा ८० वर्षीय आईवर चाकूहल्ला, शनिवार पेठेतील धक्कादायक घटना

पुणे हादरले..! संपत्तीच्या वादातून मुलाचा ८० वर्षीय आईवर चाकूहल्ला, शनिवार पेठेतील धक्कादायक घटना

पुणे : पुण्यातील शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात ६ सप्टेंबर रोजी रात्री एक धक्कादायक घटना घडली आहे. संपत्तीच्या वादातून ६५ वर्षीय मुलाने आपल्या ८० वर्षीय आईवर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. विश्रामबाग पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपी अविनाश पांडुरंग साप्ते (वय ६५, रा. अंकुश सोसायटी, मेहुणपुरा, शनिवार पेठ) याने आपली आई कुसुम साप्ते (वय ८०) यांच्यावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी अविनाशचा भाचा आशिष अशोक समेळ (वय ४५, रा. अंकुश सोसायटी, मेहुणपुरा) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अविनाशवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश, त्याची आई कुसुम आणि फिर्यादी आशिष हे मेहुणपुरा येथील अंकुश सोसायटीत एकत्र राहतात. संपत्तीच्या वाटणीसंदर्भात त्यांच्यात बराच काळ वाद सुरू होता. ६ सप्टेंबर रोजी रात्री अविनाश दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने आपल्या आईशी पुन्हा वाद घातला.

वाद विकोपाला गेल्यावर त्याने कुसुम यांच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर चाकूने वार केले, ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. कुसुम यांना वाचवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या आशिषवरही अविनाशने चाकूहल्ला केला, आणि तोही जखमी झाला. दोघांवर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अविनाश साप्तेला ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक कारके या प्रकरणाचा तपास करत आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात व्यग्र असलेल्या पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!