Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Dharashiv: उद्धव ठाकरेंना जबर धक्का! पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचा भाजपमध्ये प्रवेश

Dharashiv: उद्धव ठाकरेंना जबर धक्का! पंचायत समितीच्या माजी उपसभापतींचा भाजपमध्ये प्रवेश

Dharashiv: शिवसेना ठाकरे गटाला धाराशिवमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. या पक्षप्रवेशामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे श्याम जाधव यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात असून, धाराशिव तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय गोर्डे यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असून, या वेळी हजारो समर्थक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे दत्तात्रय गोर्डे हे शिंदेसेनेचे नेते संदीपान भुमरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे गोर्डे यांचा भाजप प्रवेश हा भुमरेंच्या राजकीय कोंडीसाठी भाजपची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!