Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Nitin Nabin BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय

Nitin Nabin BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय

Nitin Nabin BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अखेर नितीन नवीन यांची निवड करण्यात आली आहे. भाजपाकडून (BJP) 16 जानेवारीपासून राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी कार्यक्रम सुरू झाला होता, त्यानुसार आज अर्ज नामांकनप्राप्त आणि पाठिंब्याच्या जोरावर नितीन नबीन (Nitin) 37 सेटसह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी त्यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले होते. या निवडीसाठी भाजपचे जवळपास सर्व मुख्यमंत्री, राज्य युनिट प्रमुख आणि वरिष्ठ नेते उपस्थित होते. भाजपने14 डिसेंबर 2025 रोजी नितीन यांची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. आता, तेच राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.

भाजपा संगठन पर्व अनुसार भाजपचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी डॉ.के.लक्ष्मण यांनी परिपत्रकाद्वारे माहिती दिली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसाठी अर्ज आणि निवडणूक प्रक्रिया संवैधानिक आणि पारदर्शी पद्धतीने पूर्ण झालीय. 36 पैकी 30 राज्यात झालेल्या संघटनात्मक निवडणुकीनंतर अर्ज आणि अर्ज माघारी घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. देशभरातून आलेल्या विश्वास आणि समर्थनाच्या जोरावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितिन नबीन यांची निवड झाल्याचं के. लक्ष्मण यांनी जाहीर केलं.

गेल्या सहा महिन्यांत तीन प्रदेशाध्यक्ष बिनविरोध
गेल्या सहा महिन्यांत तीन राज्यांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष बिनविरोध निवडले गेले आहेत. जुलैमध्ये, हेमंत खंडेलवाल यांची मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यानंतर, डिसेंबरमध्ये, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि सात वेळा लोकसभा खासदार राहिलेले पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाली. इतर कोणीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. जानेवारीमध्ये, आदित्य साहू यांची झारखंडमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

नितीन गडकरी ते जेपी नड्डा
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी महाराष्ट्रातील नेते आणि मंत्री नितीन गडकरी यांनीही कामकाज पाहिले आहे. नितीन गडकरी हे 2009 ते 2013 या कालावधीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. त्यानंतर,2013 ते 2014 या कालावधीत राजनाथसिंह यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राजनाथसिंह यांच्यानंतर 2014 ते 2020 या कालावधीत अमित शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यानंतर, 2020 पासून जेपी नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले आहेत. दोन्ही नेत्यांच्या कार्यकाळात भाजपने मोठी आणि लक्षवेधी कामगिरी बजावली आहे. तसेच, देशात सत्ता कायम राखण्यातही त्यांना यश मिळालं. आता, भाजपने नव्या आणि तरुण चेहऱ्याकडे देशाच्या भाजपची धुरा दिली आहे. त्यानुसार, भाजपच्या आज झालेल्या निवड प्रक्रियेतून नितिन नबीन हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत.

कोण आहेत नितीन निबीन?
दरम्यान, सध्या बिहार सरकारमध्ये मंत्री असलेले नितीन नबीन यांच्याकडे पथ निर्माण विभाग तसेच नगर विकास आणि आवास विभाग ही महत्त्वाची खाती आहेत. बांकीपूर विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार असून, 2010 पासून सलग निवडणुकीत तेथून जनतेचा विश्वास मिळवत आले आहेत. याआधी त्यांनी भाजपचे छत्तीसगड प्रभारी म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. राजकीय प्रवासाकडे पाहता, 2006 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. पटना पश्चिम मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर त्यांनी बांकीपूर मतदारसंघात आपली पकड मजबूत केली. 2021 मध्ये नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये त्यांना प्रथमच मंत्रीपद देण्यात आले. याशिवाय 2016 ते 2019 या काळात त्यांनी भाजप युवा मोर्चाचे बिहार प्रदेशाध्यक्ष म्हणून संघटनात्मक कामाचा ठसा उमटवला.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!