Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

महाराष्ट्र हादरला..! निवडणूक रणधुमाळीत भाजप जिल्हा सरचिटणीसाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

महाराष्ट्र हादरला..! निवडणूक रणधुमाळीत भाजप जिल्हा सरचिटणीसाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हिंसाचाराची गंभीर घटना समोर आली आहे. कन्नड तालुक्यातील औराळा येथे भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुभाष भागीनाथ काळे यांच्यावर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सुभाष काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कन्नड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी संदर्भात चर्चा करण्यासाठी सुभाष काळे, भाजप नेते विलास भोजणे व इतर पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश गुजराणे यांच्या पेट्रोल पंपावरील कार्यालयात उपस्थित होते. याचवेळी औराळा येथील अंबादास तातेराव खवळे आणि रामदास तातेराव खवळे हे दोघे तेथे आले.

पंचायत समितीच्या तिकीट वाटपावरून त्यांनी सुभाष काळे यांच्याशी वाद घालत अश्लील शिवीगाळ सुरू केली. उपस्थितांनी मध्यस्थी करत तिकीट देणे किंवा न देणे हे त्यांच्या अधिकारात नसल्याचे समजावून सांगितले व काळे यांना वाहनात बसून निघून जाण्याचा सल्ला दिला.

मात्र काळे वाहनाकडे जात असतानाच दोन्ही आरोपींनी अचानक लोखंडी रॉडने त्यांच्यावर हल्ला चढवत बेदम मारहाण केली. हल्ल्यानंतर काळे रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले. घटनेनंतर त्यांना तातडीने कन्नड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!