नवी दिल्ली : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme सध्या भारतात Realme P4 Power नावाचा एक नवीन स्मार्टफोन आणत आहे. हा फोन २९ जानेवारी रोजी भारतात लाँच होईल, ज्याची माहिती कंपनीनेच शेअर केली आहे. हा फोन फक्त ५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये अर्धा दिवस बॅटरी लाइफ देऊ शकेल, असा कंपनीचा दावा आहे.
Realme च्या अधिकृत पोर्टलवर लिस्टेट केलेल्या डिटेल्समध्ये सांगितले की, भारतातील पहिला आणि सर्वात मोठी बॅटरी १०००१mAh मिळणार आहे. कंपनीने चांगल्या अनुभवासाठी फोनमध्ये ड्युअल-चिप तंत्रज्ञान समाविष्ट केले आहे. हा फोन MediaTex Dimensity 7400 आणि Hyper Vision AI चिपसह येईल. तो तीन कलर ऑप्शनमध्ये लाँच केला जाणार आहे. Realme ने त्याच्या अधिकृत पोर्टलवर स्मार्टफोनचे डिझाईन आणले आहे. TransSilver, TransOrange आणि TransBlue या कलर ऑप्शनमध्ये स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.
Realme P4 Power हँडसेटमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असणार आहे, ज्यामध्ये ५०MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. कॅमेराची माहिती अधिकृत पोर्टलवर दिली आहे. Realme P4 Power मध्ये १४४Hz रिफ्रेश रेट असलेला ४D कर्व्हड प्लस डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर आणि इतर अनेक फीचर्स असणार आहेत.


