Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

बीडमध्ये हत्या सत्र सुरूच, अंबाजोगाईमध्ये तरुणावर कोयत्याने सपासप वार, उपचारादरम्यान मृत्यू

बीडमध्ये हत्या सत्र सुरूच, अंबाजोगाईमध्ये तरुणावर कोयत्याने सपासप वार, उपचारादरम्यान मृत्यू

बीड : जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ असून आताही एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. अंबाजोगाईमधील पोखरी रोडवर एका तरुणावर दोन जणांनी कोयत्याने वार करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सदर तरुणाचा उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू झाला. राजकुमार करडे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने अंबाजोगाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार करडेवर पोखरी रोडवरील सारडा नगरी जवळ दोन तरुणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याच्या गळ्यावर, डोक्यात आणि पाठीवर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात करडे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे राजकुमारचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, हा हल्ला कोणी केला आणि त्यामागचे कारण हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!