Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Pune News: एकवीरा देवीच्या यात्रेत दगडफेक! कल्याण, पनवेलच्या भाविकांकडून तुफान राडा, अनेकांची पळापळ, Video

Pune News: एकवीरा देवीच्या यात्रेत दगडफेक! कल्याण, पनवेलच्या भाविकांकडून तुफान राडा, अनेकांची पळापळ, Video

Ekvira Devi Temple Viral Video : कार्ला येथील आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रेला गालबोट लागलं आहे. कार्ला गड उतरताना झालेल्या वादातून दोन गटांत तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीमुळे काही भाविक जखमी झाले आहेत. कल्याण आणि पनवेल येथील भाविकांच्या दोन गटात हमरीतुमरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन गटातील भाविकांमध्ये झालेल्या वादविवादाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

नेमकं काय घडलं?
एकविरा देवीची मुख्य यात्रा संपन्न झाल्यानंतर भाविक गड उतरत असताना हा प्रकार घडला. काल बुधवारी झालेल्या किरकोळ वादानंतर आज दुपारी पुन्हा एकदा वातावरण तापलं.किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. या अचानक झालेल्या दगडफेकीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने भविकांमध्ये पळापळही झाली.

पोलीस प्रशासनाची कारवाई
घटनेची माहिती मिळताच लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं निदर्शनास आल्यावर पुणे ग्रामीण पोलीस दलातून अतिरिक्त जवानांची कुमक मागवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राडा करणाऱ्या आणि दगडफेक करणाऱ्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तर दगडफेकीत जखमी झालेल्या भाविकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान परिसरात अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.दरम्यान सध्या कार्ला गड परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र,या घटनेमुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!