Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू

पुण्यात महिलेवर बलात्कार, आणखी एका स्वयंघोषित गुरुविरुद्ध महिलेची तक्रार; मी शंकर तू पार्वती म्हणायचा भोंदू

पालघर : राज्यात एकीकडे अशोक खरात प्रकरण चर्चेत असताना, आरोपी खरातची एसआयटी चौकशी सुरू असतानाच आता आणखी एका भोंदू बाबाचा पर्दाफाश झाला आहे. ‘मी शंकर असून तू माझी पार्वती आहे, असे सांगून एका महिलेवर बलात्कार करणार्‍या वसईतील स्वयंघोषीत धर्मगुरू ऋषिकेष वैद्य याच्याविरोधात वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील कारवाईसाठी हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला 35 वर्षांची असून पुण्यात राहते. तिने माणिकपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार 2023 मध्ये तिची ओळख वसईतील स्वयंघोषित धर्मगुरू आणि आमची वसई या संस्थेचा प्रमुख ऋषिकेश वैद्य याच्याशी फेसबुकवर झाली. त्याने पीडित महिलेच्या धार्मिक वृत्तीचा फायदा घेत अध्यात्म शिकविण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. डिसेंबर 2023 मध्ये तो तिला भेटायला पुण्यात गेला. मी महादेवाचा अवतार आहे. तू माझी पार्वती आहेस असे सांगून तिला भुलवले. त्यानंतर तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला. या काळात वैद्य याने तिच्या नकळत तिचे अश्लील छायाचित्रे काढली होती.

या छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून पुन्हा भेटायला बोलावले. मे 2025 मध्ये वसईतील हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये पीडित महिलेला भेटायला बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, नाशिकच्या अशोक खरात याचे प्रकरण बाहेर आल्यानंतर पीडित महिलेने हिम्मत दाखवून आपल्या पतीला हा प्रकार सांगितला आणि त्यांनी बुधवारी संध्याकाळी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात ऋषिकेश वैद्य याच्या विरोधात तक्रार दाखल केली.

बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडली असल्याने हे प्रकरण पुण्यातील मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केल्याची माहिती माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिरालाल जाधव यांनी दिली. दरम्यान, ऋषिकेश वैद्य याने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक मुलीना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे. याप्रकरणी, पोलीस अधिक तपास करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!