Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election Update: मनसेकडून 125 जागांची यादी तयार; 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर होणार

BMC Election Update: मनसेकडून 125 जागांची यादी तयार; 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर होणार

BMC Election Update: मुंबई महापालिका निवडणुकीकडे (BMC Election 2025) राज्याचे लक्ष लागले असताना, निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला आहे. आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत काढली जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ 7 मार्च 2022 रोजी संपला असून, तेव्हापासून प्रशासकांकडे महापालिकेची सूत्रे आहेत. मागील निवडणूक 2017 मध्ये झाली होती. त्यामुळे सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘मुंबईकरांच्या सर्वात मोठ्या निवडणुकी’ची रणधुमाळी रंगणार आहे.

हेही वाचा –‘काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा’, राज ठाकरेंनी पुण्यातील शाखा अध्यक्षांना फटकारले

मनसेची रणतयारी सुरू

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) स्वतः कार्यकर्त्यांकडून स्थानिक प्रभागांचा आढावा घेत आहेत. मनसेकडून मुंबईतील 227 पैकी तब्बल 125 प्रभागांवर संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्यात आली आहे. माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि जोगेश्वरीसारख्या मराठी बहुल भागांमध्ये पक्षाचा भर आहे. मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेत संभाव्य युतीबाबत चर्चा सुरू असली तरी जागावाटपाचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, दोन्ही पक्षांनी आपापल्या प्रभावक्षेत्रातील प्रभाग ओळखण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई महापालिकेची सध्याची स्थिती

मुंबई महानगरपालिकेत एकूण 227 नगरसेवक निवडून येतात. बहुमतासाठी 114 जागा आवश्यक आहेत. सध्या शिवसेना 93 नगरसेवकांसह आघाडीवर आहे. त्यांना मनसेहून आलेले 6 आणि 3 अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा आहे. भाजप 85 नगरसेवकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर काँग्रेसकडे 30, राष्ट्रवादीकडे 9, समाजवादी पार्टीकडे 6, एमआयएमकडे 2 आणि मनसेकडे 1 नगरसेवक आहे.

प्रभाग आरक्षण सोडतीचा वेळापत्रक

  • 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 – आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाची मान्यता घेणे.
  • 6 नोव्हेंबर 2025 – आरक्षण सोडतीची जाहिर सूचना प्रसिध्द करणे.
  • 11 नोव्हेंबर 2025 – आरक्षण सोडत आणि निकाल जाहीर
  • 14 नोव्हेंबर 2025 – प्रारूप आरक्षणाबाबत हरकती व सूचना मागवणे
  • 20 नोव्हेंबर 2025 – हरकती व सूचनांची अंतिम तारीख
  • 21 ते 27 नोव्हेंबर 2025 – आयुक्तांकडून हरकतींवर विचार
  • 28 नोव्हेंबर 2025 – अंतिम आरक्षण जाहीर व वृत्तपत्रात प्रसिध्द

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आता फक्त अधिकृत तारखांची प्रतीक्षा आहे. आरक्षण सोडतीनंतर उमेदवार निवड, युतीचे गणित आणि प्रचार या सगळ्यावर मुंबईकरांचे लक्ष केंद्रित होणार आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!