Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Navi Mumbai: ’20 टास्क पूर्ण करा, घरबसल्या पैसे मिळवा’; ‘सुचित्रा’च्या नावाखाली तरुणाचं 34,39,777 रुपयांचं बँक खात केल रिकामं

Navi Mumbai: ’20 टास्क पूर्ण करा, घरबसल्या पैसे मिळवा’; ‘सुचित्रा’च्या नावाखाली तरुणाचं 34,39,777 रुपयांचं बँक खात केल रिकामं

Navi Mumbai: टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पार्ट-टाईम जॉब देण्याचं आमिष दाखवून मोठो पैसे देण्याच्या नावाखाली उलवेतील 39 वर्षीय पुरुषाची तब्बल 34,39,777 रुपयांची फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जगनकुमार रामाराव सरदेव (रा. सेक्टर 9, उलवे) यांच्याशी टेलिग्रामवरील Suchithra (@Suchithra_P) या आयडीवरून तसेच व्हॉट्सअॅप क्रमांकावरून संपर्क साधण्यात आला. पार्ट-टाईम जॉबचे आमिष दाखवून ‘दररोज 2040 टास्क पूर्ण केले तर आकर्षक नफा मिळेल’ असे सांगण्यात आले.

अशा ऑफरच्या नावाखाली अनेक तरूणांना गुंडाळण्याचा प्रयत्न झाला होता. काही तरूणांना त्यातून माघार घेतली. मात्र, जाळ्यात अडकलेल्या तरूणांना लाखो रूपयांचा गंडा बसला.

 

दोन संशयास्पद वेबसाईट लिंक पाठवल्या

uniqlo-fashionfranchise.com

familycloth-uniq.com

 

नफ्याचं आश्वासन अन् मोठी लूट

या वेबसाईटवर अकाउंट निर्माण करून टास्क पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला पैसे जमा करण्यास भाग पाडण्यात आले. टास्क पूर्ण केल्यानंतर नफा देण्याचे आश्वासन देत आरोपींनी हप्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम भरून घेतली. फिर्यादीने पैसे परत मागितल्यावरटास्क अपूर्ण आहे”, “अजून रक्कम जमा करा” अशा कारणांनी सतत अतिरिक्त पैसे भरायला लावले. शेवटी एकूण 34.39 लाखांचे नुकसान झाल्यानंतरही रक्कम न मिळाल्याने फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.

नवी मुंबई सायबर पोलिसांचे आवाहन

मुंबई व नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन जॉब, टास्क किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली कोणत्याही अनोळखी लिंक, नंबर किंवा आयडीवर विश्वास ठेवू नका. सायबर गुन्ह्यांची मदत व तक्रारीसाठी 1930 या राष्ट्रीय हेल्पलाइनवर किंवा नवी मुंबईतील नेरुळ सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!