Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar: अजित पवारांची शेवटची सही ‘या’ फाइलवर; आमदारांना मिळणार मोठी ताकद

Ajit Pawar: अजित पवारांची शेवटची सही ‘या’ फाइलवर; आमदारांना मिळणार मोठी ताकद

मुंबई : राज्यातील आमदारांना स्थानिक विकासकामांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय मंजूर झाला असून, आमदारांना प्रत्येकी पाच कोटींच्या निधीपैकी तीन कोटी रुपये देण्यासाठी एकूण 1354 कोटींचा निधी वित्त विभागाने मंजूर केला आहे. विशेष बाब म्हणजे, आमदारांचा निधी एक कोटीवरून पाच कोटींवर नेण्याचा निर्णय घेणारे दिवंगत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनीच या निधीवाटपाच्या फाइलवर शेवटची स्वाक्षरी केली आहे.

आमदारांना भरघोस आणि समान विकास निधी मिळावा, यासाठी आग्रही असलेल्या अजित पवारांनी सर्वपक्षीय आमदारांना समान निधीचे वाटप करून जणू शेवटची राजकीय भेट दिली आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 267 विधानसभा सदस्य आणि 54 विधानपरिषद सदस्यांना हा निधी देण्यात आला आहे. मात्र, अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातील 24 आमदारांचा या टप्प्यात समावेश नाही.

दरम्यान, निधीच्या वापरात पारदर्शकता यावी यासाठी अजित पवारांनी खासदार निधीसाठीच्या ‘ई-साक्षी’च्या धर्तीवर ‘ई-समर्थ’ प्रणाली लागू करण्याचा आग्रह धरला होता. पुण्यात या प्रणालीचा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार असून, देयके थेट कंत्राटदारांच्या खात्यात जमा होणार आहेत.

२०२५-२६ आर्थिक वर्षासाठी आमदार निधीअंतर्गत 2200 कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यापैकी विविध टप्प्यांतून 1354 कोटी रुपये वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

 

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!