Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Ajit Pawar काकांसाठी पुतण्या रोहित पवार मैदानात; मित्रपक्षांकडूनच सापळा, अजितदादांनी धडा घ्यावा

Ajit Pawar काकांसाठी पुतण्या रोहित पवार मैदानात; मित्रपक्षांकडूनच सापळा, अजितदादांनी धडा घ्यावा

मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरुद्ध कारवाई करणाऱ्या आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोनवरील संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यावर टीका होत असताना त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काकांच्या समर्थनार्थ मैदानात उडी घेतली आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या कार्यशैलीचे समर्थन करताना महायुतीतील मित्रपक्षांकडूनच या संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

रोहित पवारांचा अजितदादांना पाठिंबा

रोहित पवार यांनी X वर पोस्ट करत अजित पवार यांच्या स्वभावाचे आणि कार्यपद्धतीचे समर्थन केले. ते म्हणाले, “राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेले नुकसान असे अनेक प्रश्न आहेत, पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली 35-40 वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे.”

रोहित पवार यांनी पुढे अजित पवार यांना सूचक इशारा देताना म्हटले, “करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे. आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं.”

अजित पवारांचे स्पष्टीकरण

या वादावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी X वर एक निवेदन प्रसिद्ध केले. ते म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.”

काय आहे प्रकरण?

31 ऑगस्ट 2025 रोजी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी गेले होते. यावेळी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने अजित पवार यांच्याशी फोनवर बोलण्यासाठी अंजली कृष्णा यांना फोन दिला.

व्हायरल व्हिडिओमध्ये अजित पवार अंजली यांना कारवाई थांबवण्याचे निर्देश देताना ऐकू येत आहेत. अंजली यांनी फोनवर बोलणारी व्यक्ती खरोखर उपमुख्यमंत्री आहे याची खात्री करण्यासाठी त्यांना थेट त्यांच्या नंबरवर कॉल करण्यास सांगितले, ज्यामुळे अजित पवार संतापले. त्यांनी व्हिडिओ कॉलवर बोलताना, “तुझ्यावर कारवाई करेन, तुला एवढी हिम्मत कशी झाली?” असे म्हणत धमकी दिल्याचा आरोप आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!