Today सोमवार, 27th जुलै 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Aam Aadmi Party: ‘आप’देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात; वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत देण्याची ‘गॅरंटी’

Aam Aadmi Party: ‘आप’देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात; वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत देण्याची ‘गॅरंटी’

BMC Election 2026: देशातील सर्वात मोठई महानगरपालिका असलेली मुंबई महानगरपालीकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच पक्ष इथं आपल नशिब आजमावतायत.त्यात आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही निवडणुकीच्या रिंगणात एन्ट्री घेतली आहे. आम आदमी पक्ष मुंबईतील सर्व २२७ जागा स्वबळावर लढवत आहे. नुकताच पक्षाने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. दिल्ली आणि पंजाबच्या मॉडेलवर आधारित पाणी, शिक्षण, वीज आणि दवाखाना या चार गोष्टी मुंबईकरांना मोफत देण्याचे आश्वासन ‘केजरीवालांची गॅरंटी’ या बॅनरखालीआप’ने जाहिरनाम्यामध्ये दिले आहे.

मुंबईकरांसाठी ४ ‘केजरीवाल गॅरंटी

  • मोहल्ला क्लीनिक : मोफत सल्ला, औषधे आणि चाचण्या उपलब्ध करून देण्यासाठी १००० मोहल्ला क्लीनिकची स्थापना.
  • शून्य वीज देयक :बेस्ट’द्वारे प्रति कुटुंब २०० युनिटपर्यंत मोफत वीज, मोफत मीटर बसवणे आणि विकेंद्रित सौर ऊर्जेवर भर.
  • जागतिक दर्जाचे शिक्षण : पालिका शाळांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांसाठी प्रति शाळा १ कोटी रुपयांची तरतूद. सर्व विद्यार्थ्यांना मोफत बेस्ट बस पास आणि प्रत्येक शाळेत सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीनची सुविधा.
  • मोफत आणि २४ तास पाणी : प्रत्येक घराला दरमहा २०,००० लिटरपर्यंत मोफत नळ पाणी आणि २४ तास शुद्ध पिण्याच्या पाण्याची हमी. गळती नियंत्रण योजना आणि १०० टक्के सांडपाणी प्रक्रियेसह पाणीपुरवठा व्यवस्थेचा पूर्ण कायापालट.

आतिशी यांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

आम्ही दिल्ली आणि पंजाबप्रमाणेच मुंबईत जागतिक दर्जाचे मोफत शिक्षण, मोफत आरोग्य सेवा आणि मोफत वीज देऊ. प्रस्थापित पक्षांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला असून जनहित पेक्षा लोभाला आणि भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले आहे. अफाट संपत्ती असूनही मुंबई शहरीकरण एक विद्रूप, अस्वच्छ आणि असुरक्षित बनले आहे. योग्य नियोजन केले, तर मुंबई जगासाठी एक आदर्श बनू शकते. ७५ हजार कोटी रुपयांहून अधिक अर्थसंकल्प असलेल्या या पालिकेने केवळ निकृष्ट सेवा दिल्या आहेत, अशी टीका आतिशी यांनी केली.

आप’ने कोणते उपाय दिले?

  • सर्वांसाठी घरे : परवडणारी भाड्याची घरे उपलब्ध करून देणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पुनर्वसन करणे.
  • वाहतूक आणि खड्डेमुक्त रस्ते : किमान १०,००० इलेक्ट्रिक बसेससहबेस्ट’चे पुनरुज्जीवन, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास आणि वैज्ञानिक “झिरो पॉटहोलप्रणालीद्वारे खड्डेमुक्त रस्ते. बेस्ट डेपोच्या व्यापारीकरणाला पूर्णविराम.
  • कचरा आणि स्वच्छता : कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती आणि दंडात्मक प्रणाली. २ लाख सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती आणि यांत्रिकीकरणाद्वारे मानवी हाताने मैला साफ करण्याची प्रथा बंद करणे.
  • महिला व बाल सक्षमीकरण : अल्प उत्पन्न गटातील गरोदर महिलांना मुलाच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत दरमहा ५,००० रुपयांची आर्थिक मदत. १२ वर्षांखालील मुले आणि महिलांची मोफत आरोग्य तपासणी. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि शाळांमध्ये करिअर कौन्सेलरची नियुक्ती.
  • व्यवसाय आणि फेरीवाले : दुकानाच्या परवान्यासाठी एकवेळ नोंदणी, २८० फेरीवाला क्षेत्रांची निर्मिती आणि गिग वर्कर्ससाठी विश्रांतीगृहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!