Today शुक्रवार, 18th सप्टेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Gen Z Protests: नेपाळनंतर, इराणही पेटले! महागाईने सर्वसामांन्याचे कंबरडे मोडले; जेन-झी चे सरकार विरोधात आक्रमक आंदोलन

Gen Z Protests: नेपाळनंतर, इराणही पेटले! महागाईने सर्वसामांन्याचे कंबरडे मोडले; जेन-झी चे सरकार विरोधात आक्रमक आंदोलन

Gen Z Protests: तेहरानमध्ये सुरू झालेली इराणी सरकारविरुद्धची निदर्शने आता इतर अनेक शहरांमध्ये पसरली आहेत. पश्चिम इराणमधील असदाबाद येथील निमलष्करी मुख्यालयाला निदर्शकांनी आग लावली. दक्षिण इराणमधील फासा शहरात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्डने केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. इराणी सरकारने या घटनेला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नसला तरी निदर्शक आक्रमक होत असल्याचे दिसत असून हमेदानमध्ये पोलिस आणि जनतेमध्ये संघर्ष झाले आहेत.

राजधानी तेहरानमध्ये सलग तिसऱ्या दिवशी जन-झेडचे निदर्शक रस्त्यावर उतरले. या काळात नागरिकांची पोलिस आणि सुरक्षा दलांशी चकमक झाली. बुधवारपासून २१ इराणी प्रांतांमध्ये सरकारी कार्यालये आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

इराणी चलन रियालच्या घसरणीमुळे जनतेचा रोष आणखी भडकला आहे. कारज, केश्म, इस्फहान, केरमानशाह, शिराझ आणि याझदमध्ये निदर्शने होत आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे इराणची अर्थव्यवस्था बिकट झाली आहे. महागाई ४० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. परिस्थितीत सुधारणा झालेली नाही, त्यामुळे इराणच्या मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरने राजीनामा दिला आहे.

इराणी सरकार यावर्षी लोकांवर कर लादण्याची तयारी करत आहे, परंतु आता, जन-झेड चळवळीसमोर, इराणी सरकार असहाय्य दिसत असून इराणने यासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांचे सरकार निदर्शकांशी वाटाघाटी आणि संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहे. ते म्हणाले, आम्ही संपूर्ण युद्धात गुंतलो आहोत. सध्या शत्रूने आर्थिक दबावाद्वारे आम्हाला पराभूत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. बॉम्ब, लढाऊ विमाने किंवा क्षेपणास्त्रांनी राष्ट्र जिंकता येत नाही.

आम्हाला पराभूत करण्यासाठी, त्यांना जमिनीवर आमचा सामना करावा लागेल आणि जर ते जमिनीवर या राष्ट्राचा सामना करतील आणि जर आपण दृढ, एकजूट आणि आमच्या देशाला अभिमानास्पद बनवण्यासाठी एकत्र काम करण्यासाठी वचनबद्ध राहिलो तर त्यांना इराणला गुडघे टेकायला लावणे त्यांना अशक्य होईल.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!