Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Narendra Modi : “महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रेरणास्थान”; बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींची खास पोस्ट

Narendra Modi : “महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रेरणास्थान”; बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त पंतप्रधान मोदींची खास पोस्ट

Balasaheb Thackeray birth Anniversary 2026 : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून सुरुवात होत असून, या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे नेतृत्व, अशा शब्दांत पंतप्रधानांनी बाळासाहेबांचे स्मरण केले.

पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून लिहिलेल्या या पोस्टमध्ये बाळासाहेबांसोबतचे दोन जुने फोटोही शेअर केले आहेत. बाळासाहेब ठाकरे जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते, असे त्यांनी नमूद केले आहे.

पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणतात की, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणी यासाठी ओळखले जाणारे बाळासाहेब केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेची त्यांना विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि निर्भय भाष्य ठळकपणे दिसून येते, असेही मोदींनी नमूद केले.

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी बाळासाहेबांचा जो दृष्टिकोन होता, तो आजही आम्हाला प्रेरणा देतो आणि तो साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही बाळासाहेब ठाकरेंना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन केले. आपल्या पोस्टमध्ये शरद पवार म्हणाले की, बाळासाहेबांनी ठाम विचारसरणी आणि निर्भीड ठाकरी बाणा जपत महाराष्ट्राच्या हिताशी कधीही तडजोड केली नाही. राजकारणात मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक कटुता नसावी, हा संस्कार देणारे रोखठोक आणि परखड भाष्यकार म्हणून बाळासाहेबांचे योगदान कायम स्मरणात राहील.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!