Today सोमवार, 2nd नोव्हेंबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

BMC Election Results 2026: मुंबईत गेम पालटला? भाजपच्या विजयाची आशा असताना फटक्यात ठाकरेंच्या जागा वाढल्या

BMC Election Results 2026: मुंबईत गेम पालटला? भाजपच्या विजयाची आशा असताना फटक्यात ठाकरेंच्या जागा वाढल्या

BMC Election Results 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीत शुक्रवारी संध्याकाळी मोठा ट्विस्ट निर्माण झाला. शुक्रवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मोठी आघाडी घेतली होती. तर ठाकरे बंधूंचा खेळ 70 जागांच्या आतमध्ये आटोपणार, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, यंदा मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीच्या पॅटर्नमध्ये झालेल्या बदलामुळे शुक्रवारी संध्याकाळी मोठा ट्विस्ट निर्माण झाला. त्यामुळे दुपारपर्यंत भाजप एकहाती 100 जागांच्या पुढे जाईल, असे वाटत असतानाच आता मुंबईतील चित्र बदलताना दिसत आहे.

100 जागांच्या जवळ पोहोचलेला भाजप 82 जागांपर्यंत खाली आला आहे. तर ठाकरे गटाने 57 जागांवरून 63 जागांवर झेप घेतली आहे. अजूनही मुंबईतील बऱ्याच वॉर्डांमधील मतमोजणी बाकी असल्यामुळे हे निकाल आणखी बदलू शकतात. त्यामुळे ठाकरे बंधूंनी आशा पूर्णपणे सोडलेली नाही. भाजप नेत्यांनी मुंबई जिंकल्याचा आनंद व्यक्त करायला सुरुवात केली असतानाच राज आणि उद्धव ठाकरे हे अद्याप मौन बाळगून आहेत. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये मुंबईच्या मतमोजणीत मोठे फेरबदल पाहायला मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीत आतापर्यंत 157 जागांचा निकाल जाहीर झाला आहे, तर 72 जागांचा निकाल अद्याप बाकी आहे. मात्र, या सर्व जागा पकडून शिवसेना-भाजप युतीला अद्यापही बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. भाजप आतापर्यंत 60 तर शिवसेना 17 जागांवर मिळून 77 जागांवर विजयी झाले आहेत. तर उर्वरीत जागांवर संमिश्र कल आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला 39 जागांवर विजय तर मनसे सहा जागांवर विजय मिळा आहे. त्यामुळे मुंबईत उरलेल्या जागांवर कोण बाजी मारणार,याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरु झाली. तेव्हापासून आतापर्यंत भाजप 82, शिंदे गट 26, ठाकरे गट 63, मनसे 7, शरद पवार गट 1, काँग्रेस 22, अपक्ष उमेदवार 10 जागांवर आघाडीवर आहे. पुढील काही तासांमध्ये भाजप आणि शिंदे गटाच्या जागा कमी होऊन ठाकरे गटाच्या जागा वाढल्यास मुंबईत रंजक राजकीय परिस्थिती निर्माण होऊ शकते. मुंबई महानगरपालिकेत बहुमताचा आकडा 114 इतका आहे. ठाकरे बंधूंनी काँग्रेस-वंचितशी युती केल्यास नाट्यमय घडामोडी घडू शकतात.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा निकाल

भाजप- 82
शिवसेना-26
ठाकरे गट-63
मनसे-7
शरद पवार गट-1
काँग्रेस-22
अजित पवार गट-2
अपक्ष -10

Bookmark (0)
Please login to bookmark Close
ज्योती कदम

Team Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!