Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरू

मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलिसांकडून चौकशी सुरू

मुंबई: शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल प्राप्त झाला. बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर परिसरात तात्काळ सुरक्षा वाढवण्यात आली. तसेच न्यायालयाच्या इमारतीतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि उपस्थित लोकांना सुरक्षिततेसाठी बाहेर काढण्यात आले. न्यायालयातील सर्व न्यायालयीन कामकाज आणि प्रशासकीय कामकाज तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक तसेच श्वान पथके दाखल झाली असून त्यांनी इमारतीच्या प्रत्येक कोपऱ्याचा सविस्तर तपास सुरू केला आहे.

धमकीचा ईमेल कसा आणि कोणाकडून पाठवला गेला याचा शोध घेण्यासाठी सायबर तपास सुरू आहे. पोलिसांनी न्यायालयाच्या परिसराभोवती सुरक्षा बळकटी केली असून, प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, धमकी मिळाल्यानंतर त्वरित सुरक्षा उपाययोजना राबवण्यात आल्या. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून ईमेलमधील माहितीच्या आधारे संभाव्य धोक्याचा आढावा घेतला जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील कर्मचारी आणि न्यायालयीन कामकाजाशी संबंधित व्यक्तींना सुरक्षा आणि सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी न्यायालय परिसराजवळ गर्दी करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तथापी, आज दिल्ली उच्च न्यायालयालाही बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. धमकीच्या ईमेलमध्ये न्यायाधीशांच्या खोलीत तीन बॉम्ब ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. यासोबतच दुपारी 2 वाजेपर्यंत न्यायालय परिसर रिकामा करण्याचे सांगण्यात आले आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
भक्ती आघाव

भक्ती आघाव

भक्ती आघाव या सध्या महाराष्ट्र जागरण ऑनलाईनमध्ये कंटेंट लीड म्हणून कार्यरत आहेत. 2018 पासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय असून राजकीय, मनोरंजन, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडी, क्रीडा आणि गुन्हेगारी विषयांवरील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेत पदवी पूर्ण केली. शैक्षणिक वाटचाल पूर्ण केल्यानंतर त्यांनी कृषीकिंग, ETV भारत, महाराष्ट्र न्यूज आणि लेटेस्टली मराठी यांसारख्या माध्यमांच्या ऑनलाईन टीममध्ये कामाचा समृद्ध अनुभव घेतला आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!