Today बुधवार, 28th ऑक्टोबर 2026
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Shivsena Politics : बाळासाहेबांचे महत्त्व कमी करण्याचा कट, आनंद दिघेंच्या ‘त्या’ फोटोवरून नवा वाद

Shivsena Politics : बाळासाहेबांचे महत्त्व कमी करण्याचा कट, आनंद दिघेंच्या ‘त्या’ फोटोवरून नवा वाद

मुंबई : शिवसेनेतील गटबाजीला नवे रूप आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जाहिरातीतील एका फोटोमुळे आता ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांच्या विरुद्ध आमनेसामने आले आहेत. जाहिरातीमध्ये शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी आनंद दिघेंचा फोटो लावण्यात आला होता, यावरून ठाकरे गटाने ‘बाळासाहेबांचे महत्त्व कमी करण्याचा कट’ असा थेट आरोप केला आहे.

शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी या फोटोवरून शिंदे गटावर हल्लाबोल केला. “आनंद दिघे हे नेते किंवा उपनेते नव्हते, ते फक्त ठाणे जिल्हाप्रमुख होते. तरीही बाळासाहेबांच्या बरोबरीने त्यांचा फोटो का लावला? हे बाळासाहेबांचे स्थान कमी करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आहे,” असे राऊत म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून ठाणे शहरात राऊतांविरोधात आंदोलनही झाले. शिवसैनिकांनी राऊतांच्या ‘अपमानजनक’ वक्तव्याचा निषेध करत घोषणा दिल्या.

यावर शिंदे गटाकडून तत्काळ पलटवार! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, “दिघेसाहेबांसारख्या खऱ्या शिवसैनिकांना खोट्या वृत्तीच्या लोकांना कळणार नाहीत. संजय राऊतांनी इतिहास आणि दिघेसाहेबांचे योगदान अभ्यासावे.” शिंदे यांचे हे विधान सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, शिंदे गटातील नेते म्हणतात की आनंद दिघे हे ‘धर्मवीर’ होते आणि त्यांचा बाळासाहेबांशी जवळचा संबंध होता. शिंदे स्वतः दिघेंचे शिष्य म्हणून ओळखले जातात आणि ते नेहमीच बाळासाहेब व दिघेंचे फोटो जाहिरातींमध्ये एकत्र ठेवतात.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!