Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्या; फायद्याच्या नादात होईल तोटा

सणासुदीच्या काळात ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्या; फायद्याच्या नादात होईल तोटा

मुंबई : सणासुदीच्या काळात प्रत्येकजण Amazon Great Indian Festival आणि Flipkart Big Billion Days सारख्या मोठ्या सेलची वाट पाहत आहे. मात्र, खऱ्या ऑफर्सबद्दल उत्साह असताना स्कॅमर देखील या संधीचा गैरफायदा घेऊ शकतात. सेल फक्त काही दिवसांवर आहे आणि स्कॅमर आधीच लोकांना आकर्षित करण्यासाठी बनावट स्क्रीनशॉट आणि लिंक्स शेअर करत आहेत. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.

WhatsApp आणि इतर मेसेजिंग अॅप्सवर अनेक फॉरवर्ड केलेले मेसेज फिरत आहेत ज्यात फक्त एक रुपयांत फोन देण्याचा दावा केला जात आहे, तर खरी किंमत २०००० ते ४०००० रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जाते. या खोट्या दाव्यांवर विश्वास ठेवून लोक लिंक्सवर क्लिक करतात आणि फसवणुकीचे बळी पडतात. AI मुळे स्कॅमर अधिक हुशार झाले. AI तंत्रज्ञानामुळे परिस्थिती आणखी कठीण झाली आहे.

आता स्कॅमर्ससाठी Amazon किंवा Flipkart सारख्या दिसणाऱ्या क्लोन वेबसाईट आणि स्क्रीनशॉट तयार करणे आश्चर्यकारकपणे सोपे झाले आहे. म्हणूनच खऱ्या आणि बनावट साइट्समध्ये फरक करणे सामान्य लोकांसाठी एक आव्हान बनले आहे.

स्कॅमर्स तयार करतात बनावट वेबसाईट

स्कॅमर या बनावट वेबसाईटवर पेमेंट पेज तयार करतात, जे अगदी खऱ्या वेबसाईटसारखे दिसतात. युजर्स खऱ्या साईटवरून खरेदी करत आहेत, परंतु पेमेंट होताच, पैसे थेट स्कॅमरच्या खात्यात जातात. कधीकधी, तुमची वैयक्तिक माहिती आणि फोटो देखील चुकीच्या हातात जातात. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!