पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 29 सप्टेंबर 2025 रोजी मुलाखत द्यावी लागणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान, वर्धा येथे महिला एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला वर्धा येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
⇒ पदाचे नाव : महिला एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, लॅब तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट.
⇒ एकूण रिक्त पदे : 04 पदे.
⇒ नोकरीचे ठिकाण : वर्धा.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 16 सप्टेंबर 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2025, संध्याकाळी 05:00 पर्यंत.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद, वर्धा.
⇒ निवड प्रक्रिया : मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख : 29 सप्टेंबर 2025.
⇒ मुलाखतीची पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यालय.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.zpwardha.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


