Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर; मोदी-शहांची भेट घेणार, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा?

Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर; मोदी-शहांची भेट घेणार, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा?

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच दिल्ली दौरा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. त्या सध्या दिल्लीत दाखल झाल्या असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता असल्याचे वृत्त साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांच्या विलीनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवारांनंतर सुनेत्रा पवारांकडे सूत्रे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राजकीय सूत्रे सुनेत्रा पवार यांच्या हाती आली आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवारांकडील अर्थ खाते वगळता उर्वरित महत्त्वाची खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. याशिवाय बीड आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात आले आहे.

विलीनीकरणाचा निर्णय झाला होता?

दरम्यान, अजित पवारांच्या निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना तात्पुरता ब्रेक लागल्याचे सांगितले जात असले तरी, शरद पवार गटातील काही नेत्यांनी विलीनीकरणाचा निर्णय आधीच झाला होता आणि त्याची घोषणा होणार होती, असा दावा केला आहे. मात्र, या घोषणेपूर्वीच अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने प्रक्रिया रखडल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपची भूमिका ठरणार निर्णायक

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा सध्या एनडीएचा घटक पक्ष असल्याने, दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणासाठी भाजपची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच सुनेत्रा पवार या दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याशी यासंदर्भात चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विलीनीकरणाबाबत भाजपला विश्वासात घेणे गरजेचे असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

रोहित पवारही दिल्लीत

दरम्यान, अजित पवारांच्या अपघातानंतर रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अपघाताबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रोहित पवार हे देखील सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, ते काही महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेणार असल्याचे समजते. दिल्लीत ते पत्रकार परिषद घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय हालचालींना वेग

एकीकडे सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा आणि दुसरीकडे रोहित पवारांची उपस्थिती, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीबाबत तर्क-वितर्कांना वेग आला आहे. विलीनीकरण, नेतृत्वाची दिशा आणि सत्तेतील समीकरणे यावर पुढील काही दिवसांत मोठे निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!