पुणे : नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पुण्यात भाजपने संघटनात्मक शिस्तीचा कठोर संदेश दिला आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या तब्बल 69 बंडखोर कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान पक्षाने उमेदवारी न दिल्याने अनेक कार्यकर्त्यांनी अपक्ष किंवा अन्य पक्षांच्या माध्यमातून अधिकृत भाजप उमेदवारांविरोधात निवडणूक लढवली होती. यालाच पक्षशिस्तीचा गंभीर भंग मानत भाजपने ही निर्णायक कारवाई केली आहे.
सहा वर्षे कोणतीही जबाबदारी नाही
निलंबित करण्यात आलेल्या 69 जणांना पुढील सहा वर्षांच्या कालावधीत पक्षातील कोणतेही पद, संघटनात्मक जबाबदारी किंवा अधिकृत भूमिका दिली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांबाबत कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा ठाम इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे.
पत्राद्वारे कारवाई जाहीर
या संदर्भातील अधिकृत पत्र समोर आले असून, त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची स्वाक्षरी आहे. पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, “भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्यांचे पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन करण्यात येत आहे. सदर कारवाई तात्काळ लागू करण्यात येत आहे.”
भविष्यातही कठोर कारवाईचा इशारा
शहर व जिल्हा भाजप नेतृत्वाने यावेळी स्पष्ट केले आहे की, भविष्यात कोणताही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता पक्षविरोधी भूमिका घेत असल्यास त्याच्यावरही अशीच कठोर कारवाई करण्यात येईल. या निर्णयामुळे पुण्यातील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटनात्मक शिस्त अधिक कडक करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
एका बाजूला पक्षातील अंतर्गत बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला नाराज कार्यकर्त्यांची संख्या मोठी असल्याचे वास्तव या दोन्ही कारणांमुळे भाजपच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. आगामी महापालिका व इतर निवडणुकांमध्ये या कारवाईचा नेमका काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपमधून हकालपट्टी केलेल्या ६९ जणांची नावे
1. धनंजय जाधव
2. चंद्रकांत पाटे
3. कादंबरी साळवी
4. जितेंद्र टकले
5. किशोर तरवडे
6. अमोल बालवडकर
7. सोमनाथ गुंड
8. मानसी सोमनाथ गुंड
9. अनिता तळाठी
10. पल्लवी गाडगीळ
11. दत्ता भगत
12. विनोद मोहिते
13. रमेश भंडारी
14. समाधान शिंदे
15. मधुकर मुसळे
16. प्रकाश डोरे
17. बाळासाहेब सानवडे
18. मंजू वाघमारे
19. प्रीती वालकर
20. संदीप लोणकर
21. स्मिता गायकवाड
22. संतोष शिंदे
23. युवराज कुञ्जेकर
24. इफ्तियाज मोमीन
25. अप्पणा दादावाडकर
26. पुरुषोत्तम अप्पणा दादावाडकर
27. अभिजीत उपाध्ये
28. छाया गवळी
29. नवल कुसाळ
30. समीर पठाण
31. प्रणव मोरे
32. योगेश सूर्यवंशी
33. अर्चना योगेश सूर्यवंशी
34. नलिनी मोरे
35. संगिता ठोसर
36. अनिल मेमाणे
37. नितीन मारकड
38. सतीश मारकड
39. वर्षा मारकड
40. रुपेश धुले
41. बापू पोकळे
42. किरण वाळुंज
43. अमोल रायकर
44. संदीप पोकळे
45. मोहिनी देवकर
46. रितेश रासकर
47. सचिन दशरथ दांगट
48. सुरेंद्र कांबळे
49. संदीप जन्हाड
50. सुनीता गलांडे
51. किशोर वाघमारे
52. विजय चौगुले
53. अकबर पठाण
54. राजू साखरे
55. ऐश्वर्या जाधव
56. जितेंद्र जगताप
57. प्रविण खेडकर
58. स्मिता खेडकर
59. उज्वला गोडे
60. बाळासाहेब घोडके
61. सुरेश धनगर
62. स्वाती धनगर
63. सुवर्णा भरेकर
64. पल्लवी केदारी
65. राहुल रामे
66. हरीष परदेशी
67. बंडू जाधव
68. नीता थोरवे
69. प्रीतम नागापुरे


