Devendra Fadnavis At Davos : जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राची विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘गेटवे ऑफ इंडिया’ असल्याचा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचा ओघ येणार असून, यामुळे सुमारे ३५ लाख नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या राज्यात तिसरी मुंबई आकाराला येत असून, या परिसरासाठी देश-विदेशातील उद्योगांकडून भरीव गुंतवणूक मिळण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
Maharashtra @ Davos 2026
🤝MoU Signed between
Govt of Maharashtra & Lodha Developers Ltd.Total investment: ₹1,00,000 crore
Employment: 1,50,000Sector: IT/ITes – Data Centres
Region : Mumbai Metropolitan Region
CM Devendra Fadnavis & Abhishek Lodha, MD and CEO, Lodha… pic.twitter.com/xf11WkzRrI
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 19, 2026
नवी मुंबई परिसरात मेगा प्रकल्पांची उभारणी
मुख्यमंत्र्यांच्या माहितीनुसार, सध्या १० ते १२ वेगवेगळ्या क्षेत्रांतील उद्योगांशी चर्चा सुरू आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ पुढील महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत.
- एज्यु-सिटी
- इनोव्हेशन सिटी
- स्पोर्ट्स सिटी
- मेडिसिटी
गेल्या दशकात महाराष्ट्राने सातत्याने १० टक्क्यांहून अधिक विकासदर राखला आहे. हीच गती कायम राहिली, तर २०३२ ऐवजी २०३० पर्यंतच महाराष्ट्र १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
आत्तापर्यंत महाराष्ट्रात आलेल्या मोठ्या गुंतवणुका
एसबीजी ग्रुप
▪️ गुंतवणूक : 20 बिलियन डॉलर
▪️ रोजगार : 4.5 लाख
▪️ क्षेत्र : लॉजिस्टिक्स
▪️ ठिकाण : मुंबई व मुंबई महानगर
सूरजागड इस्पात लिमिटेड
▪️ गुंतवणूक : 20 हजार कोटी रुपये
▪️ रोजगार : 8 हजार
▪️ क्षेत्र : स्टील
▪️ ठिकाण : गडचिरोली
सुमिटोमो रिअॅलिटी अँड डेव्हलपमेंट
▪️ गुंतवणूक : 8 बिलियन डॉलर
▪️ रोजगार : 80 हजार
के. रहेजा कॉर्पोरेशन
▪️ गुंतवणूक : 10 बिलियन डॉलर
▪️ रोजगार : 1 लाख
अल्टा कॅपिटल / पंचशील रिअॅलिटी
▪️ गुंतवणूक : 25 बिलियन डॉलर
▪️ रोजगार : 2.5 लाख
आयआयएएम ग्लोबल
▪️ गुंतवणूक : 8 बिलियन डॉलर
▪️ रोजगार : 80 हजार
बीएफएन फोर्जिंग्ज
▪️ गुंतवणूक : 565 कोटी रुपये
▪️ रोजगार : 847
▪️ क्षेत्र : स्टील
▪️ ठिकाण : पालघर व मुंबई महानगर
योकी ग्रीन एनर्जी लिमिटेड
▪️ गुंतवणूक : 4 हजार कोटी रुपये
▪️ रोजगार : 6 हजार
▪️ क्षेत्र : पुनर्वापरयोग्य ऊर्जा
▪️ ठिकाण : पालघर व मुंबई महानगर


