Today गुरूवार, 28th मे 2026
Breaking News
Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

Laxman Hake : सरकारचं टेन्शन वाढलं; ओबीसीतील ‘या’ जातींना एससीतून आरक्षण द्या, लक्ष्मण हाकेंची मागणी

Laxman Hake : सरकारचं टेन्शन वाढलं; ओबीसीतील ‘या’ जातींना एससीतून आरक्षण द्या, लक्ष्मण हाकेंची मागणी

Laxman Hake Controversy : महाराष्ट्रात हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सरकारी जीआरमुळे मराठा आणि ओबीसी समाजात तणाव निर्माण झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आता नव्या मागणीने सामाजिक वातावरण ढवळून काढले आहे. राज्यभर दौरे करत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या हाकेंनी धोबी, नाभिक आणि बलुत्या-आलुत्या समाजाला अनुसूचित जाती (SC) मधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे नवा वाद उफाळला असून, सामाजिक आणि राजकीय पडसाद उमटत आहेत.

‘SC-ST मध्ये आरक्षण मिळाल्यास आनंदच

लक्ष्मण हाके यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं, “धोबी, नाभिक आणि बलुत्या-आलुत्या समाजाला SC-ST मधून आरक्षण मिळावं. देशभरात या जाती SC-ST मध्ये समाविष्ट आहेत. जर या समाजांना असं आरक्षण मिळणार असेल, तर आम्हाला त्याचा आनंदच आहे. पण यापूर्वी ओबीसींचे हक्क डावलण्याचा प्रयत्न झाला, तर गावातील 18 पगड जातींच्या हक्कांसाठी मी रस्त्यावर उतरेन.” हाकेंनी सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाजात ‘घुसखोरी’ होत असल्याचा आरोपही केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने आरक्षणाच्या मुद्द्यावर नवं वादळ निर्माण झालं आहे.

पँथर सेनेचा आक्रमक इशारा

हाकेंच्या या मागणीने पँथर सेना संतप्त झाली आहे. संघटनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी हाकेंना थेट इशारा देत म्हटलं, “SC आरक्षणाकडे वाकड्या नजरेने पाहू नका. जर कोणी असा प्रयत्न केला, तर डोळे काढून हातात देऊ!” पँथर सेनेने हाकेंच्या वक्तव्याला तीव्र विरोध दर्शवत SC-ST आरक्षणाच्या हक्कांचं रक्षण करण्याची भूमिका घेतली आहे. या प्रतिक्रियेमुळे सामाजिक तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बंजारा समाजाचीही मागणी

दरम्यान, हैदराबाद गॅझेटच्या आधारावर मराठा समाजाला कुणबी ठरवत ओबीसी कोट्यातून आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने बंजारा समाजानेही आपली मागणी तीव्र केली आहे. गॅझेटमध्ये बंजारा समाजाची नोंद अनुसूचित जमाती (ST) मध्ये असल्याने त्यांना ST कोट्यातून आरक्षण मिळावं, अशी मागणी बंजारा समाजाने लावून धरली आहे. यासाठी बुलढाण्यात बंजारा समाजाकडून लवकरच भव्य मोर्चा काढण्याची तयारी सुरू आहे.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!