पुणे : धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. धुळ्याच्या जिल्हा रुग्णालयात आयसीटीसी समुपदेशक, रक्तपेढी समपदेशक, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ यासह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला धुळे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत अनेक रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
⇒ पदाचे नाव : आयसीटीसी समुपदेशक, रक्तपेढी समपदेशक, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
⇒ एकूण रिक्त पदे : 04 पदे.
⇒ नोकरीचे ठिकाण : धुळे
⇒ वेतन/ एकत्रित मानधन : दरमहा रु. 21,000/-.
⇒ वयोमर्यादा : ६० वर्षांपर्यंत.
⇒ अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 19 सप्टेंबर 2025.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025.
⇒ अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट, जुने सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस, बस स्टँडजवळ, साक्री रोड, धुळे.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://dhule.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.


