Gopichand Padalkar Jayant Patil Controversy : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका करताना मर्यादा ओलांडली.
एका कार्यक्रमात पडळकर म्हणाले, “अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला वाटत नाही, काहीतरी गडबड आहे का?” या व्हायरल व्हिडीओमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत पडळकरांचे कान टोचले. ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेत अशी वक्तव्ये वेदनादायी आणि अयोग्य आहेत. प्रत्येकाने बोलताना मर्यादा पाळावी.
” पडळकरांच्या वादग्रस्त विधानावर महायुतीचे धोरण स्पष्ट करताना पवार म्हणाले, “प्रत्येक पक्षाच्या नेत्याने आपापल्या सहकाऱ्यांच्या वक्तव्याची जबाबदारी घ्यावी. भाजपच्या बाबतीत ही जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांची आहे, ते यावर बोलतील.”
महायुतीतील शिवसेनेसाठी एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीसाठी स्वतः अजित पवार जबाबदार असल्याचेही त्यांनी नमूद केले. पडळकरांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, फडणवीस यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पडळकरांचं वादग्रस्त विधान चर्चेत?
गोपीचंद पडळकरांचा एका कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. “अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे, कार्यक्रम करायची. तुझ्यासारखी मी औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे?”, असे विधान पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल केले होते.


