मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीतील एका कार्यक्रमात महायुती सरकारवर सडकून टीका केली. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासमोरच त्यांनी लाडकी बहिण योजनेतील ४८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करत सरकारला धडक मारली. “माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लं चलतं, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी मटण खाण्याच्या मुद्द्यावरूनही सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
याशिवाय, वोट चोरी, अमित शाह भेट आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळ न देण्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. दिंडोरीच्या खेडगावात महात्मा फुलेंच्या पुतळ्याचे अनावरण असलेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या.
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका
त्यांनी मटण खाण्याच्या मुद्द्यावरून स्पष्टपणे सांगितले, “आम्ही आमच्या पैशाने मटण खातो, आम्ही कुणाचे मिंधे नाही.” यासंदर्भात मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरही त्यांनी टीका केली. “पत्ते तुम्ही खेळायचे आणि कोर्टात चकरा आम्ही मारायच्या का? तुमची आब्रु तुमच्याच माणसाने घालवली. व्हिडीओ कोणी काढला?” असा धक्कादायक सवाल उपस्थित करत त्यांनी कोकाटे यांच्या वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणाला हात लावला. सुळे यांनी पुढे सांगितले की, “रोहित पवार यांना सारख्या नोटिसा येतात, पण आमचा रोहित घाबरत नाही.” या वक्तव्याने उपस्थितांमध्ये टाळ्या वाजल्या आणि सरकारच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित झाले.
मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, म्हणून दिल्लीत अमित शाहांची भेट
सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळ न देण्यावरूनही हल्लाबोल केला. “१० वेळा वेळ मागितली, तरी मुख्यमंत्री वेळ देत नाहीत. म्हणून आम्ही थेट दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतो,” असे म्हणत त्यांनी गृहminister अमित शाह यांचे जाहीर आभार मानले. “जुळवून दोन्ही बाजूने घ्यावं लागत, एका बाजूने नाही,” असा टोला मंत्री नरहरी झिरवाळ यांना लगावला.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री म्हणाले होते सरसकट कर्जमाफी देतो. ओला दुष्काळ जाहीर करावा म्हणून फक्त राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमित शाह यांच्याकडे गेले होते. ते गृहमंत्री नाही तर सहकार मंत्री आहेत, म्हणून अधिकार त्यांना आहे.” शरद पवारांच्या पुरोगामी भूमिकेचे कौतुक करत सुळे यांनी सांगितले, “५० वर्षांपूर्वी शरद पवार एका मुलीवर थांबले. स्वतःचं ऑपरेशन केलं, मात्र पत्नीचे नाही, हे खरं पुरोगामित्व आहे.” यामुळे कार्यक्रमात उत्साहाची लहर उसळली.
“रोहित घाबरत नाही, माझ्या गावाचा रस्ता झाला नाही”
सुळे यांनी रोहित पवार यांच्या नोटिसांवर बोलताना म्हटले, “आमच्या रोहितला सारख्या नोटिसा येतात, पण आमचा रोहित घाबरत नाही.” छगन भुजबळांच्या जेलमधून बाहेर येण्याच्या विधानाचा उल्लेख करत, “सत्य परेशान हो सकता है, पराजीत नाही,” असे सांगितले. “मी ६० पैकी ३० वर्ष विरोधात होते. सत्तेत असताना आम्ही सगळे चांगले निर्णय घेतले. माझ्या राज्याचं नाव देशात १ नंबर असावे अशी इच्छा आहे,” असे म्हणत त्यांनी झिरवाळ यांना कॅबिनेटमध्ये जाऊन सरकारला दुःख सांगण्याचा सल्ला दिला.


