Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

खळबळजनक..! स्कूल बस चालकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, धमकावून नेलं शेतात…

खळबळजनक..! स्कूल बस चालकाचा दहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, धमकावून नेलं शेतात…

जळगाव : राज्यात महिलांवरील बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता जळगाव शहरातून एक बलात्काराची बातमी उघडकीस आली आहे. एका दहावीच्या विद्यार्थिनीवर तिच्याच स्कूल बस चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यावरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आबिद हुसेन शेख जलील (वय-३८) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आबिद हा स्कूल बस चालक आहे. ज्या मुलीला तो दररोज शाळेत सोडायला आणि आणायला जात होता, त्याच मुलीवर त्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच नराधमाने मुलीला धमकावत एका शेतात नेत तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. .

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या प्रकरणी पीडितेचा जबाब घेतला असता बस चालकाने विनयभंग नाही तर बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत स्कूल बस चालक अबिद हुसेन शेख जलील याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Maharashtra Jagran

Maharashtra Jagran

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!