Maharashtra Jagran: Your Trusted Source for Marathi News and Updates

Maharashtra Jagran : Your Trusted Companion for the Latest News

Post Widget 1

Heath Tips

  • In enim justo, rhoncus ut, imperdiet a
  • Fringilla vel, aliquet nec, vulputateDonec pede justo,  eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo.Nullam dictum felis eu pede mollis pretium.

Post Widget 2

‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांच्या वक्त्यव्याने एकच चर्चा

‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका…’, जयंत पाटील यांच्या वक्त्यव्याने एकच चर्चा

मुंबई: बुधवारी (दि. १२) मुबंईत शक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलन झाले. यासाठी आझाद मैदानात हजारो शेतकरी आपल्या कुटुंबासह दाखल झाले आहेत. कोल्हापूर आणि सांगलीसह बारा जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले आहेत. आंदोलनकर्त्यांना भेण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य आमदार जयंत पाटील यांचा समावेश होता.

यावेळी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी एक खळबळजनक विधान केले. पाटील म्हणाले, ‘माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका’. त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ काय, त्यांचा रोख कोणाकडे यासंदर्भात स्पष्टपणे काहीच पाटील भाषणात बोलले नाहीत. परंतु, यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपले ऐकले असते, तर ते खासदार राहिले असते, असे वक्तव्य केले.

लोकसभेची निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत पाटील म्हणाले, राजू शेट्टी हे आमचा सल्ला ऐकत नाही. लोकसभेला त्यांनी माझे ऐकले असते, तर ते खासदार राहिले असते. आता आपली एकी कायम ठेवा. तसेच संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असे देखील जयंत पाटील यांनी म्हटले.

भाषणात पुढे बोलताना जयंत पाटील यांनी राजकीय फटकेबाजी करत सरकारला चांगलेच घेरले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला. शेट्टी यांना चांगलेच माहिती आहे, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना त्याचा अनुभव आला आहे. आम्ही सर्वजण भाषण करुन दमलो आहोत. कारण नागरिकांना पैसे देऊन शांत केले जाते. त्यातच हिंदुत्व समोर असते. आता तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल, असंही पाटील म्हणाले.

Bookmark (0)
Please login to bookmark Close
Yogesh Kangude

टीम महाराष्ट्र जागरण

महाराष्ट्र जागरण" हे एक मराठी वृत्तपत्र आहे जे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, समाजकारण, मनोरंजन, खेळ, व्यापार आणि इतर महत्त्वाच्या घटनांची माहिती पुरवते. हे वृत्तपत्र लोकांपर्यंत महत्त्वाची बातमी पोहोचवण्याचे कार्य करते आणि महाराष्ट्रातील वाचक वर्गात लोकप्रिय आहे. महाराष्ट्र जागरण हे विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घटकांवर लक्ष केंद्रित करते आणि त्याच्या माध्यमातून वाचकांना आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे, समाजातील सुधारणा साधण्याचे आणि सकारात्मक विचारांची पेरणी करण्याचे काम करते. या वृत्तपत्राची वाचनाची पद्धत लोकांसोबत संवाद साधून आणि त्यांना ताज्या घटनांबद्दल जागरूक ठेवून केली जाते. "महाराष्ट्र जागरण" ची ओळख त्यांच्या गंभीर पत्रकारिते, वाचकांची विश्वासार्हता आणि विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विषयांवर आधारित विश्लेषणात्मक दृष्टिकोनामुळे आहे.

संबंधित लेख

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

हे देखील वाचा x

error: Content is protected !!