Maharashtra MLC Election Result News : राज्यातील १७ विधान परिषद जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. उर्वरित ११ जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुन्हा एकदा महायुतीने मोठं वर्चस्व सिद्ध केलं आहे. १७ पैकी १६ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
धाराशिव-बीड-लातूर मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे महेश देशमुख यांचा दणदणीत पराभव करत राज्यात सर्वाधिक मताधिक्य मिळवल्याचं चित्र आहे. या मतदारसंघात 99.49% मतदान झाल्याने निकालाबाबत मोठी उत्सुकता होती.
बसवराज पाटील (भाजप): 845 मते
महेश देशमुख (काँग्रेस): 124 मते
अवैध/कोऱ्या मतपत्रिका: 14
दरम्यान, नाशिकमध्ये मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत धक्कादायक विजय मिळवला. 303 मतांचा कोटा असतानाही गीते यांनी विजय मिळवत महायुतीला मोठा धक्का दिला आहे.
या निकालांमुळे राज्याच्या राजकारणात महायुतीची ताकद अधोरेखित झाली असली तरी नाशिकमधील पराभवामुळे रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.


