पुणे : फादर्स डेच्या दिवशीच काळजाला चटका लावणारी घटना घडली असून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भीषण अपघातात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील उदापूर परिसरात हा अपघात घडल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वाहनांच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. आनंद आणि उत्सवाचा दिवस असलेल्या फादर्स डेवरच ही दुर्दैवी घटना घडल्याने कुटुंबावर आणि परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले, मात्र दोघांचेही प्राण वाचवता आले नाहीत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ आणि संताप व्यक्त केला जात असून महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


